Sushil kumar Shinde News  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : सुशीलकुमार शिंदेंची तिसरी पिढी राजकारणात? नातू शिखर यात्रेत सोबत दिसल्याने चर्चा सुरू

शिखर पहारिया हाच वारस आहे की काय असा संदेश तर सुशीलकुमार शिंदे देऊ पाहत नाहीत ना, अशी चर्चा सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मोठी मुलगी स्मृती शिंदे यांचे चिरंजीव शिखर पहरिया हे आज सिद्धेश्वर महायात्रेत प्रकर्षाने दिसून आले. याद्वारे शिंदेंनी आपल्या विरोधकांना सौम्य झटका दिला.

त्यामुळे आता आपल्या राजकारणाचा शिखर पहारिया हाच वारस आहे की काय असा संदेश तर शिंदे देऊ पाहत नाहीत ना, अशी चर्चा सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे. (Latest Marathi News)

सोलापुरात (Solapur) आज ग्रामदैवत सिद्धेश्वर महायात्रेचा महत्वपूर्ण विधी अक्षता सोहळा संमती कट्ट्यावर पार पडला.या अक्षता सोहळ्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे पत्नी उज्वला शिंदे आणि नातू शिखर पहारिया यांच्यासह उपस्थित होते.

सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांचे नातू शिखर हे सोलापूरमधील कोणत्याही सार्वजनिक उत्सवात कधी सहभागी होत नव्हते. पण आज १४ जानेवारी रोजी सिद्धेश्वर महायात्रेत सुशीलकुमार शिंदेंसह त्यांचे नातू शिखर देखील उपस्थित होते. मी आता दरवर्षी सिद्धेश्वर महायात्रेला हजर राहणार, असे यावेळी शिखर यांनी सांगितले.

सुशीलकुमार शिंदे यांना तीन मुलीच आहेत. प्रणिती शिंदे या सोलापूरच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्या सोलापूर शहर मध्यमधून आमदार आहेत. शिंदे यांना मुलगा नसल्याने त्यांचा वारस प्रणिती शिंदे यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, सुशीलकुमार शिंदेनी शिखर पहारिया यांना सिद्धेश्वर महायात्रेत आणून विरोधकांना हलका झटका दिल्याचे बोलले जात आहे.

शिखरच्या राजकीय एन्ट्रीवर शिंदेंना विचारल असता त्यांनी ही नवी पिढी स्वतः चा निर्णय स्वतः घेईल असं म्हणत अप्रयत्यक्षरित्या नातवाच्या राजकारणातील नव्या इनिंगची घोषणाच केलीय. शिखर हे मुंबईतील सुप्रसिद्ध उद्योजक संजय पहारिया यांचे चिरंजीव आहेत. मध्यंतरी शिखरचं नाव बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिच्याशी जोडलं गेलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT