suresh dhas Saam tv
महाराष्ट्र

Suresh Dhas : मी बोललो की बीडची बदनामी होते असा आरोप होतो; भर स्टेजवरून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरेश धसांचा कुणावर नेम?

Suresh Dhas latest Speech : सुरेश धस यांनी बीडमधील कार्यक्रमातून बीडमधील राजकीय नेत्यांवर भाष्य केलं. त्यांनी संतोष धस प्रकरणावर भाष्य केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरेश धसांनी संतोष देशमुख प्रकरणावर भाष्य केलं.

Vishal Gangurde

बीड : संतोष देशमुख प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून संतोष देशमुख प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील वातावरण धगधगत आहे. या प्रकरणावरून सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले. त्यानंतर आज सुरेश धस यांनी पुन्हा जाहीर कार्यक्रमातून अप्रत्यक्षरित्या संतोष देशमुख प्रकरणावर भाष्य केलं. 'मी बोललो की बीडची बदनामी होते असा आरोप होतो, असं म्हणत आमदार सुरेश धस यांनी अप्रत्यक्षरित्या बीडमधील राजकीय नेत्यांवर भाष्य केलं.

आज मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफल साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण केले. या खुंटेफळ तलावामुळे ३० गावांमधील तब्बल ८० हजार एकर ओलिताखाली येणार आहे. २८०० कोटी रुपयांच्या महत्वकांक्षी प्रकल्पातून स्थानिक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.

सुरेश धस यांचे भाषणातील मुद्दे

आम्हाला पाणी मिळालं, तेव्हा अजित पवार जलसंपदा मंत्री होते. त्यावेळी रामराजे विरोध करत होते. ज्यावेळी सर्वेक्षण केलं, त्यावेळी ४०० लोक दगड मारत होते. मी दगडं खात होतो. मी कितीतरी शिव्या खाल्या. मला राजेश खन्ना यांचा दुश्मन हा सिनेमा आठवला. येथे खुंटेफळमधील लोक देखील असतील. मला त्यांनीही दगडे मारली, त्यावेळी काही अधिकारीसोबत होते. त्यावेळी माझी नडगी फोडली. किमान ४०० लोक दगडं मारत होते. तेव्हा एकटाच माणून रस्त्यावर होता. तो म्हणजे सुरेश धस. त्यानंतर मी सर्वांची मने जिंकली. मने जिंकून त्यांना पैसे दिले. राहिलेल्या लोकांनाही पैसे द्यायचे आहे. आता १५१ हेक्टरचा मार्ग काढा, एवढी प्रामाणिक विनंती आहे.

ज्या कालावधीत २०१३ सालच्या पुढे देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली. त्यावेळी रामदास कदम या खात्याचे मंत्री होते. आता ते खाते पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. मी जवळपास २०२४ साली पडलो. तेव्हा खुंटेफळ तलावाचं २ टक्के काम झालं. त्यानंतर मी निवडून आल्यावर २३ टक्के काम पूर्ण झालं. देवेंद्र फडणवीस जलसंपदा होते. महाराष्ट्रातातील पहिला पपिंग मशिनरीला एका दिवसांत परवानगी मिळाली. हे एवढं मोठं काम म्हणजे ४० टक्के काम झालं आहे. आता तुमच्या हस्ते बोगद्याचाही शुभारंभ झाला आहे. तुम्ही एक शब्दावर ३०० कोटी रुपये दिले.

काही पैसे दोन गावांना लागत आहे. तर काही पैसे शेतकरी आणि कंत्राटदारांना द्यायचे आहे. तुम्ही सभागृहात सांगितलं की, तुम्हाला ३०० कोटी रुपये देणार असल्याचे सांगितले. मराठवाड्याला ७ टीएमसी पाणी दिलं. त्यातील १.६८ टक्के पाणी आम्हाला आलं. आणखी एका धरणाचं ७ टीएमसी पाणी आणि ९.६६ टीएमसी पाणी दिलं तर बीड जिल्हा आणि आष्टी तालुका,धाराशिव जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा पाण्याचा प्रश्न मिटेल.

आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहे. बाकी कोणाकडूनही अपेक्षा नाही. फक्त फक्त देवेंद्र बाहूबली हेच पाणी देतील. मला ४ टीएमसी पाणी दिलं तर पलीकडे जाता येईल. तुम्ही प्रशांत बंब यांची योजना एका फटक्यात केली. त्यांच्यासारखा मी तुमचा लाडका आहे. त्यांनी माझे खूप लाड केले आहेत.

बीड जिल्ह्यावर सुरेश धस काय म्हणाले?

काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होते. पण या जिल्ह्याने क्रांतीसिंह नाना पाटील यांना निवडून दिलं. या जिल्ह्याने रखमाजी पाटील गावडे यांना निवडून दिलं. ज्यांचं गाव तीन किलोमीटर अंतरावर आहे. ते धनगर समाजाचे होते. त्यांना या जिल्ह्याने निवडून दिलं. केसरबाई क्षीरसागर, बबनराव ढाकणे यांना निवडून दिलं. या जिल्ह्याने प्रमोद महाजन यांना निवडून दिलं. गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेते दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT