Suresh Dhas meets Dhananjay Munde saam tv
महाराष्ट्र

Suresh Dhas meets Dhananjay Munde: धस-मुंडे संघर्षात ट्विस्ट; सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची गुप्तभेट, तब्बल साडेचार तास चर्चा

Suresh Dhas meets Dhananjay Munde: आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची गुप्तभेट झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

Bharat Jadhav

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे आमने सामने आलेत. बीडमध्ये धस आणि मुंडे संघर्ष टोकाला गेलाय, त्याच दरम्यान भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आलीय. दोन्ही नेत्यांनी तब्बल साडेचार तास चर्चा केल्याची माहिती समोर आलीय.

धस आणि मुंडे यांच्या भेटीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया दिलीय. भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणली. पण ही अतिशय गंभीर बाब असल्याचं दामानिया म्हणाल्या आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यामध्ये रुग्णालयात गुप्तभेट झाली.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्याशी धनंजय मुंडे यांची जवळचे संबंध असल्याने धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही धस यांनी केली होती. धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सुद्धा धस यांनी केला होता.

आता आरोप करणाऱ्या धस यांनी मुंडे यांची भेट घेतल्याने भुवया उंचावल्या आहेत. दोन्ही नेत्यांची एका खासगी रुग्णालयात भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये समेट झालाय का? अशी चर्चा सुरू झालीय. दोन्ही नेते तब्बल साडेचार तास चर्चा करत असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आपण , धनंजय मुंडे, सुरेश धस साडेचार तास एकत्र होतो,अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी साम टीव्हीला दिलीय. त्यामुळे या नेत्यांमध्ये कोणत्या विषयांवरून चर्चा झाली याचे तर्क लावले जात आहेत.

दरम्यान आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून प्रतिक्रिया दिलीय. धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. ज्यावेळी त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी दिवसाढवळ्या मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. संघर्ष आणि तब्येतीची विचारपूस करणं हे वेगवेगळं आहे. आमचा संघर्ष चालूच राहील. त्यांच्या तब्येतची विचारपूस करणं यात काही चुकीचं नसल्याचं धस म्हणालेत. तसेच धनंजय मुंडे आणि आपली भेट घडवण्यात कोणीच मध्यस्थी केली नसल्याचं धस म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

Women Health Care: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची; स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' सल्ले

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

X युजर्स सावधान! हे नियम पाळा नाहीतर तुमचंही अकाउंट होईल Delete

SCROLL FOR NEXT