Suraj Pratap Salunkhe Satara News Saam TV
महाराष्ट्र

कर्तव्य बजावताना ह्रदयविकाराचा झटका; साताऱ्यातील जवानाचे लडाखमध्ये निधन

सूरज यांना कर्तव्य बजावत असताना ह्रदयविकाराचा झटका आला.

साम टिव्ही ब्युरो

सातारा : साताऱ्यातील खटाव तालुक्यातील जवान सूरज प्रताप शेळके (वय २४) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. लेह-लडाख येथे कर्तव्य बजावत असताना सूरज यांना वीरमरण आले आहे. लष्करात सेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Satara Marathi News)

वीर जवान सुरज हे ७ मार्च रोजी सुट्टी संपवून लेह येथे पुन्हा लष्करी सेवेत रुजू झाले होते. ४ वर्षांपूर्वी आटलरी-१४१ फिल्ड रेजिमेंटमध्ये ते भरती झाले होते. लष्करात भरती होऊन त्यांनी ४ वर्ष देशसेवा केली. मात्र वयाच्या २४ व्या वर्षी त्यांना देशसेवा करताना वीरमरण आलं. (Satara Khatav Latest News)

दरम्यान, सूरज यांच्या पश्चात आईवडील आणि भाऊ असा परिवार आहे. सूरज यांचे पार्थिव आज संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांच्या खटाव या मूळ गावी आणण्यात येणार आहे. सूरज यांच्या निधनाने शेळके कुटुंबावर आणि खटाव गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honda Bike: होंडाने लाँच केली स्वस्त बाईक; Hero Xtreme ला जबरदस्त स्पर्धा, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Maharashtra Live News Update : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे त्र्यंबकेश्वर दर्शनाला

Cyber Crime News : टेलिग्रामवर नोकरीचं आमिष दाखवून ६ लाखांची फसवणूक; मुंबईतील धक्कादायक घटना

Kumbha Rashi : कुंभ राशीचे भाग्य आज उजळणार, गरिबी होणार दूर वाचा राशीभविष्य

Gold Price: सोन्याचा भाव घसरला! महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी खरेदीदारांना दिलासा; वाचा लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT