भाजपनं ठरवलंय उद्धव ठाकरेंना एकटं पाडायचं आणि बाकीच्यांना त्यांच्याकडे आणायचं - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांसह मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam TV
Published On

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांना दूरदृष्यप्रणालीद्वारे नुकतेच मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांसह मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यावर हल्लाबोल केला. भाजपने शिवसेनेचा (Shivsena) विचार संपवायचा डाव आखला आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. भाजपनं (bjp) ठरवलंय उद्धव ठाकरेंना एकटं पाडायचं आणि बाकीच्यांना त्यांच्याकडे आणायचं. आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला. माझ्या शिवसैनिकांच्या पाठीत मी कधीच खंजीर खुपसला नाही, अशी टीका ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर केली आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra political crisis: महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले 'हे' आदेश

यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, मी शिवसेनेच्या वर्धापन दिवशी म्हटलं होतं, गद्दारांची अवलाद आपल्यात नको ती पुन्हा एकादा आली आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेसोबत राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.बंडखोर आमदारांची ओळख शिवसैनिकांनी करुन दिली आहे. तरीपण यांनी मातोश्रीची,माझी ,ठाकरे कुटुंबीयांची बनदामी केलीय. सरकार असो वा नसो शिवसेना ही मर्दांची आहे.

ठाकरे पुढे म्हणाले, एक घाव दोन तुकडे करायचे तर करुयात. राष्ट्रवादी खूप त्रास देतेय हे शिंदेंनी सांगितलं होतं. आमदार माझ्याकडे आले असते तर मार्ग काढता आला असता. शिवसेनाप्रमुखांनी शेवटी सांगितलं होतं उद्धवला आणि कुटुंबाला जपा, त्यानुसार तुम्ही आम्हाला जपत आहात. मला मुख्यमंत्रीपदाचा मोह नव्हता, मी पद मोकळं करायला तयार आहे, कुणीही या शिवसेनाला पुढं न्या. तुम्ही मला सांगा दूर व्हा मी पद सोडतो. भाजप शिवसेनेचा विचार संपवायला निघाली आहे. त्यांच्यासोबत गेलेले आमदार खूष नाहीत, २१ आमदार माझ्या संपर्कात आहेत. ह्यांना भाजपला जाण्याशिवाय पर्याय नाही आणि भाजपला तेच पाहिजे. शिवसेना हा विचार आहे, तो भाजपला संपवायचा आहे.

Uddhav Thackeray
एकनाथ शिंदे गटापुढे मोठा पेच, सत्ता स्थापनेसाठी कोणता निर्णय घेणार ?

मुख्यमंत्री म्हणून मी काय सुख भोगलंय ते सांगा. बंडखोर आमदार जनतेत संभ्रम निर्माण करत आहे. उपमुख्यमंत्री व्हायचं होतं तर मला सांगायचं मी केलं असतं उपमुख्यमंत्री, असा टोलाही एकनाथ शिंदे यांना ठाकरेंनी लगावला. उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आहे म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी आहेत. मी बंडाच्या पाठीशी नाही. संभ्रम पसरवला जात आहे. भाजपनं ठरवलंय उद्धव ठाकरेंना एकटं पाडायचं, आणि बाकीच्यांना इकडे आणायचं.

आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला. माझ्या शिवसैनिकांच्या पाठीत मी कधीच खंजीर खुपसला नाही. शिवसेना ही तलवारीसारखी आहे. म्यानातून काढली की तळपते. भाजपचा शिवसेना संपवण्याचा डाव आहे. शिवसेनेची युती भाजपने तोडली. शेराला सव्वाशेर भेटतोच. बाळासाहेबांनी हिंदू फुटू नये म्हणून आवाहन केलं होतं. पण ज्याला जायचं असेल त्याच्यासाठी दरवाजा मोकळा आहे. जे आमदार गेलेत त्यातील अनेकांना पळवलं आहे. मी मोह सोडलाय जिद्द सोड़ली नाही, असंही ठाकरे म्हणाले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com