Supriya sule
Supriya sule  Saam Tv
महाराष्ट्र

मी मुख्यमंत्री व्हावे की नाही ते महाराष्ट्राचे लोक ठरवतील : सुप्रिया सुळे

साम टिव्ही ब्युरो

कैलास चौधरी

उस्मानाबाद : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या उस्मानाबाद (osmanabad) जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील मोठमोठ्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. संत गोरोबा काका मंदिर त्रिविक्रम मंदिर,कालेश्वर मंदिर, हातलादेवी आणि तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला. त्यावेळी त्यांनी 'मी मुख्यमंत्री व्हावे की नाही ते महाराष्ट्राचे लोक ठरवतील',असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. ( Supriya sule Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे या उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी उस्मानाबादमधील तुळजापूरसहित अनेक मंदिरात जाऊन दैवतांचे दर्शन घेतले. मंदिरात जाऊन बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'देवळात येऊन काही मागू नये. आपल्याला जे दिले आहे ते आशीर्वाद समजून देवाचे आभार मानायला हवे. सगळे म्हणत होते की, देवळात गेल्यावर काही मागणी करा. त्यावेळी चांगला पाऊस पडूदे आणि बळीराजाचं राज्य येऊदे एवढंच मागितले. मी मुख्यमंत्री व्हावे की नाही ते महाराष्ट्राचे लोक ठरवतील ,याचे उत्तर माझ्याकडे नाही'.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या उस्मानाबाद दौऱ्यात कार्यकर्त्यांचे नाराजी नाट्यही पाहायला मिळाले. उस्मानाबादेत आज सुप्रिया सुळे यांचा ताफा नाराज मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवला. या नाराज कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीचे मुस्लिम नगरसेवक व कार्यकर्ते यांचा सामावेश आहे. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी नाराज कार्यकर्ते यांना स्वत:च्या वाहनात बसविले. तर स्वत: दुसऱ्या वाहनात बसल्या. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. सुळे यांनी उस्मानाबाद दौऱ्यादरम्यान मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांना भेट न दिल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : फिक्स झालं, जरांगे पाटील आता थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात!

Special Report : भाजप झाला मोठा, संघ झाला मोठा? नड्डांच्या वक्तव्याने भाजपवर सारवासारवची वेळ?

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

Special Report : "त्यांना बघून घेईन.." उद्धव ठाकरेंनी पोलिसांना खुला इशारा का दिला?

PM Narendra Modi : यांच्या ४ पिढ्यांनी दिल्लीवर राज्य केलं, पण..., PM नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT