Supriya Sule News Saam TV
महाराष्ट्र

Supriya Sule News: बाप लेकीसाठी आभाळ! सुप्रिया सुळेंनी शरद पवारांना चप्पल घालण्यास केली मदत; व्हिडीओ व्हायरल

Supriya Sule Sharad Pawar News: कार्यक्रमात शरद पवार आले असता त्यांना चप्पल घालण्यासाठी सुप्रिया सुळेंनी मदत केलीये.

साम टिव्ही ब्युरो

Latur News:

खासदार सुप्रिया सुळे राजकारणासह प्रत्येक गोष्टीत आपल्या वडिलांना आधाराची काठी बनत साथ देतात. बापलेकीच्या नात्यातील गोडव्याचा आणि प्रेमाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या ८२ वर्षांचे आहेत. इतकं जास्त वय असून अद्यापही जनतेसाठी ते राजकारणात सक्रिय आहेत. वय झाल्याने शरद पवारांना तब्येतीसंबंधी काही अडचणींचा सामना करावा लागतोय. अशात एका कार्यक्रमात शरद पवार आले असता त्यांना चप्पल घालण्यासाठी सुप्रिया सुळेंनी मदत केलीये.

सुप्रिया सुळेंनी आणि शरद पवार लातून येथील एका कार्यक्रमात आले होते. यावेळी शरद पवार पायात चपला घालत होते. बाबांना चप्पल घालताना त्रास होत असल्याचं लक्षात येताच सुप्रिया सुळे थेट खाली बसल्या. त्यांनी वडिलांना स्वत:च्या हाताने पायात चप्पल घालण्यास मदद केली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय तसेच सोशल मीडियावर देखील वडिलांसाठी असलेल्या प्रेमाचे सर्वजण कौतुक करत आहेत.

अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. शिवसेनेसोबत जे झालं तेच राष्ट्रवादीसोबत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अशात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रिया सुळेंनी म्हटलं की, "राज्यात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी स्व कष्टाने पक्ष वाढवला. भाजप हे पाप करत आहेत शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं तरीही वेळ लागतो यावर काय बोलणार." असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Police Dog : बुटांच्या वासावरून शोधला गुन्हेगार; जेस्सीची ही कहाणी ऐकाच

Pandharpur: आधी बायकोची मुलांसोबत आत्महत्या, नवऱ्यानंही उचललं टोकाचं पाऊल; पंढरपूर हादरलं

रश्मिका मंदानाची लहान बहीण आहे तरी कोण? काय करते?

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

Dindyachi Bhaji Recipe : दींडाची गावरान चमचमीत भाजी बनवण्याची पारंपारिक पद्धत जाणून घ्या

SCROLL FOR NEXT