Supriya Sule News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल पहाटेच्या शपथविधीवर मोठं वक्तव्य केलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शदर पवार यांनी डबल गेम केला असं, फडणवीस म्हणाले. त्यावर आपण गुगली टाकली आणि त्यांची विकेट गेली असं पवारांनी म्हटलं आहे. अशात आता यावरुन पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी चर्चेत आलाय. यावरुन भाजपवर टीका करत राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. (Latest Marathi News)
देवेंद्र फडणवीस शपथविधीमध्ये इतके अडकले आहेत की, त्यांना इतर प्रश्न दिसत नाहीत. ते महागाई, महिला सुरक्षा या मुद्द्यांवर बोलत नाहीत. आमचं दुःख आहे की ते अन्याय होतात त्यावर का बोलत नाही? प्रशासन सोडून सातत्याने गॉसिप करणे हे दुर्दैवी आहे, असा टोला सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना लगावला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आपल्या एका मुलाखतीमध्ये पहाटेच्या शपथविधी बाबत मोठा गौप्यस्फोट केला. शपथविधी होण्यााधी राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा यासाठी तयार होते. मात्र २ दिवसांआधी नकार देत पवारांनी डबल गेम केला असं फडणवीसांनी म्हटलं आहे. त्यावर सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे की, " आम्हाला मतदारसंघात भरपूर कामे आहेत. गॉसिप करायला वेळ नाही. चुईंगम झाले आहे हा विषय यात आता चव उरली नाही."
"नोकऱ्या कशा मिळतील या विषयी तुम्ही बोलत नाही. काही झालं नाही तर पहाटेचा शपथविधी हेच विषय आहेत. भाजप शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुढे काही दिसत नाही. महाराष्ट्रात राजकारणात माझे वडील आणि भाऊ यांच्या शिवाय काही दिसत नाही.", असं हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.