Supriya Sule News Saam TV
महाराष्ट्र

Supriya Sule News: भाजप म्हणजे काखेत कळसा अन् गावाला वळसा...; मंत्र्याची यादी देत कंत्राटी भरतीवरून सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र

Supriya Sule Critisism on Devendra Fadnavis: काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने आपल्या कार्यकाळात कधीही कंत्राटी तत्वावर कार्यकारी पदे भरली नव्हती, असं सुप्रिया सुळेंनी ठामपणे सांगितलं आहे.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News:

कंत्राटी भरतीवरून राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला. तसेच कंत्राटी भरतीवरून मविआ सरकारवर सडकून टिकास्त्र सोडलं. यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला सडेतोड उत्तर देत मंत्र्यांच्या नावाची यादी दिलीये.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कंत्राटी भरतीचं पाप १०० टक्के काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आहे, काल जीआर रद्दची घोषणा करताना देवेंद्र फडवीसांनी असं म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्ताव्याला प्रत्युत्तर देत सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत लिहिलं की, " शरद पवार त्यावेळेला मुख्यमंत्री नव्हते. ज्या जीआर बदल ते बोलत आहेत तो २०११ चा जीआर आहे. भाजप म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा. माफीनामा...! माफीनामा...!! असे ओरडत भाजपने ढोंगीपणा करून जनतेची दिशाभूल करणे अगोदर बंद करावे. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने आपल्या कार्यकाळात कधीही कंत्राटी तत्वावर कार्यकारी पदे भरली नव्हती, असं सुप्रिया सुळेंनी ठामपणे सांगितलं आहे.

कंत्राटी पद्धत कुणी सुरु केली याचा शोध भाजपाने जरुर घ्यावा. राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांनी संघटीतपणे केलेल्या विरोधापुढे हे सरकार झुकले आहे. आता आपले अपयश लपविण्यासाठी माफिनाम्याचे खूळ भाजपाने काढले आहे. उप-उपमुख्यमंत्री महोदयांना जुने संदर्भ काढून आपल्या चुकांचे खापर पुर्वसूरींवर फोडायची खोड आहे, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय.

'हवाबाण' सोडण्याची हिंमत केली नसती

उगाच वडाची साल पिंपळाला लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा ज्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार चालविता त्यांच्याशी दोन शब्द बोलून घेतले असते तरी आपण हे 'हवाबाण' सोडण्याची हिंमत केली नसती. कंत्राटी भरतीचा निर्णय २०११ व २०२१ सालच्या मंत्रिमंडळाने केला म्हणायचं आणि दुसरीकडे त्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांसोबत सत्ता उपभोगायची. या स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजण्याच्या भाजप वृत्तीचे कार्ड महाराष्ट्राच्या जनतेपुढे मुळीच चालणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

भाजपाच्या नेत्यांना संदर्भ आठवत नसतील तर पुढील यादीतील नेत्यांना संपर्क साधावा.

२०११ सालातील मंत्री

1. विजयकुमार गावीत,

2. राधाकृष्ण विखे पाटील,

3. अजित पवार,

4. नारायण राणे,

5. दिलीप वळसे पाटील,

6.छगन भुजबळ,

7. सुनील तटकरे,

8. हसन मुश्रीफ

महाविकास आघाडीच्या शासनकाळातील मंत्री ..

1. एकनाथ शिंदे

2. अजित पवार,

3. दिलीप वळसे पाटील,

4. छगन भुजबळ,

5. उदय सामंत,

6. धनंजय मुंडे,

7. शंभूराज देसाई,

8. गुलाबराव पाटील,

9. दादा भुसे,

10. संजय राठोड,

11. संदीपान भुमरे,

12 अब्दुल सत्तार,

13. संजय बनसोडे,

14. आदिती तटकरे

मंत्र्यांच्या नावांची अशी यादी सुप्रिया सुळेंनी सादर करत देवेंद्र फडवीसांसह भाजपचा चांगलाच समाचार घेतलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT