Supreme Court ruling on cooperative bank directors in Maharashtra saamtv
महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का; 10 वर्ष पूर्ण केलेल्या संचालकांना निवडणुकीत बंदी

Supreme Court On Cooperative Bank Election: आता बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची, सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे राज्यातील नेत्यांना मोठा धक्का बसलाय. तब्बल 100हून अधिक नेत्यांना सहकारी क्षेत्रावरची पकड निसटण्याची चिन्हे आहेत. न्यायालयानं नेमका काय निर्णय दिलाय? कोणते आहेत हे नेते?.पाहूयात यावरचा हा रिपोर्ट.

Rohit Kadam

सर्वोच्च न्यायालयानं सहकार सम्राटांना मोठा धक्का दिलाय... बँकिंग सुधारणा कायद्यानुसार 10 वर्षे संचालक पदाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या 100हून अधिक संचालकांना आता निवडणूक लढवता येणार नाही. उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्यानं सातारा, सांगली आणि कोल्हापूरसह राज्यभरातील जिल्हा बँकांतील दिग्गजांच्या अडचणी वाढल्यात. त्यामुळे RBIच्या कारवाईवर आता सुप्रीम कोर्टानेही शिक्कामोर्तब केलयं.

सलग 10 वर्षे संचालकपदी राहिलेल्या व्यक्तींची पात्रता संपुष्टात आणण्याच्या RBIच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिका कोर्टानं फेटाळल्या. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर RBIनं केलेली बडतर्फीची कारवाई उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवलीय. सातारा, सांगली आणि कोल्हापूर भागातील सुमारे 27 सहकार सम्राटांना निवडणूक लढवण्यास रोखणाऱ्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलयं.

दरम्यान याप्रकरणात बँकिग तज्ज्ञांचे काय म्हणणं आहे. ऐका. दुसरीकडे या निर्णयामुळे राज्यातील आजी-माजी मंत्री, खासदार आणि आमदारांसह 100 हून अधिक नेत्यांची मात्र अडचण झालीय. येत्या जिल्हा बँकेच्या निवडणुकांमध्ये कोणत्या दिग्गजांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे, पाहा.

दिग्गज सहकार सम्राटांवर

अपात्रतेची टांगती तलवार

बाबासाहेब पाटील

अनिल पाटील

हसन मुश्रीफ

दत्ता भरणे

संजय सावकारे

दिलीप वळसे पाटील

प्रवीण दरेकर

प्रसाद लाड

उदयनराजे भोसले

प्रताप पाटील चिखलीकर

गुलाबराव देवकर

सुनील राऊत

राजेश विटेकर

विनय कोरे

एकनाथ खडसे

सुरेश देशमुख

रमेश थोरात

रामप्रसाद बोर्डीकर

सुरेश वरपुडकर

विशाल पाटील

मुळात जिल्हा बँका या फक्त आर्थिक व्यवहार चालवण्यासाठी नसून ग्रामीण महाराष्ट्रातील राजकारणाची नाडी मानल्या जातात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील अनेक जिल्हा बँकांमध्ये या निर्णयामुळे राजकीय पोकळी निर्माण झालीय.

बँकिंग सुधारणा कायद्याच्या माध्यमातून रिझर्व्ह बँकेने आणि सर्वोच्च न्यायालयाने सहकारी बँकांमधील एकाधिकारशाही संपवण्याचा ऐतिहासिक प्रयत्न केला असला. तरी, या निर्णयामुळे सहकार क्षेत्रातील जुनी घराणेशाही खरोखर संपणार की फक्त चेहरे बदलून होऊन अप्रत्यक्ष सत्ता ही सहकार सम्राटांकडेच राहणार? हे जिल्हा बँकांच्या निकालातून स्पष्ट होईलच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra MLC Elections: महायुतीत कुठे दिलजमाई, कुठे बंडखोरी कायम; 5 मतदारसंघात कुणामध्ये रंगणार लढत?

Dengue Fever : डेंग्यूचा सर्वाधिक धोका कोणाला? रुग्णसंख्या वाढण्यामागची कारणे

NCP Corporator Disqualified: शरद पवार गटाला मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचं पद रद्द; काय आहे कारण?

Manoj Jarange-Eknath Shinde: ५०० कोटींच्या आरोपावर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले, मनोज जरांगेंना सल्लाही दिला

Clove Water Benefits: लवंगाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या हे ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT