OBC Reservation hearing in Supreme Court  Saam Tv
महाराष्ट्र

OBC Reservation: न्यायालयाने OBC आरक्षणाचा अंतरिम अहवाल फेटाळला

आज सर्वाेच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासाठीची सुनावणी हाेती.

Siddharth Latkar

दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणासाठी (obc reservation) दाखल केलेला अहवाल प्रायोगिक अभ्यास आणि संशोधनाशिवाय तयार करण्यात आला आहे असे नमूद करीत सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) राज्य मागासवर्ग आयाेगाचा अहवाल आज (गुरुवार) फेटाळला आहे. (OBC Reservation News)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये २७ टक्के ओबीसींसाठी राखीव जागा असाव्यात यासाठी सरकारने सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. यासाठी इम्पेरिकल डाटा न्यायालयात सादर करण्यात आला हाेता.

दरम्यान संबंधित अहवाल अभ्यास आणि संशोधनाशिवाय तयार केल्याचे मत नाेंदवत त्यास न्यायालयाने मंजूरी दिली नाही. तसेच न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात असे सूचविले आहे. आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे (local bodies election) चित्र लवकरच स्पष्ट हाेईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे सेवा विस्कळीत

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT