Sharad Pawar vs Ajit Pawar NCP  Saam TV
महाराष्ट्र

NCP News: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं? आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, आतापर्यंत काय घडलं?

Supreme Court On NCP Party And Symbol Hearing: निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत दाखल केलेल्या याचिकेवर आज (मंगळवारी) सुनावणी होणार आहे.

Ruchika Jadhav

प्रमोद जगताप

Political News :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत दाखल केलेल्या याचिकेवर आज (मंगळवारी) सुनावणी होणार आहे.

मागच्या सुनावणीवेळी कोर्टाने अजित पवार गटाला शरद पवार यांचा फोटो आणि नाव वापरणार नाही असं प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं होतं. कोर्टाच्या सुचनेनुसार शनिवारी अजित पवार यांच्या पक्षाकडून ते प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं आहे.

तुम्ही घड्याळाशिवाय एखाद्या वेगळ्या चिन्हाचा विचार का करत नाही? जेणेकरून तुम्हालाही संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत कुठला त्रास होणार नाही, आशिही टिपण्णी सुप्रीम कोर्टाने केली होती होती. त्यानंतर आज ही महत्त्वाची सुनावणी पार पडत आहे. आज कोर्ट काय सूचना करत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मागच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?

शरद पवार गटाकडून वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तीवाद केला होता. यामध्ये त्यांनी "अजित पवार शरद पवारांचा फोटो आणि घड्याळ कसं वापरतात? ही फसवणूक आहे. आमच्या लोकप्रियतेचा वापर का केला जातो आहे? असे प्रश्न कोर्टात उपस्थित केले होते.

ग्रामीण भागात लोक म्हणत आहेत की घड्याळाला मत द्या. अजित पवार गटाचे पोस्टर्स पाहा, त्यावर शरद पवारांचा फोटो आहे. असे म्हणत अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाचे पोस्टर्सही न्यायालयात दाखवले होते.

या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने शरद पवार यांचं नाव आणि चिन्ह वापरणार नाहीत असं लेखी द्या, असे निर्देश अजित पवार गटाला दिले होते. यावर शनिवारी प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं होतं. हे प्रतिज्ञापत्र सादर झाल्यानंतर आज पुढील सुनावणी पार पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budhwar che Upay: बुधवारच्या दिवशी फक्त करा 'ही' कामं; नशीब चमकून मिळेल पैसा

Maharashtra Rain Live News : मुंबईला आज पुन्हा रेड अलर्ट

Redmi 15 5G Launched: दमदार फीचर्ससह शाओमीच्या स्मार्टफोनची एंट्री, Redmi 15 5G मोबाईल भारतात लाँच, किंमत किती?

Teacher Salary: गणेशोत्सवापूर्वी शिक्षकांचे पगार रखडणार, सरकारने वेतन का अडवले? वाचा

Pune Rain Flood : पिंपरी-चिंचवडमध्ये कोसळधारा, अनेक ठिकाणी पूरस्थिती, ६०० हून अधिक कुटुंबीय स्थलांतरित

SCROLL FOR NEXT