SUPREME COURT BIG VERDICT saam tv
महाराष्ट्र

शिक्षकांसाठी गुड न्यूज! सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला दणका; पगारवाढीचा मार्ग मोकळा

Maharashtra Zilla Parishad Teachers Graduate Pay Scale: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या याचिका फेटाळल्या. जिल्हा परिषद शाळांमधील सहावी ते आठवीच्या पात्र विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Omkar Sonawane

जिल्हा परिषद शाळांमधील सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकविणाऱ्या विषय शिक्षकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ केवळ एकतृतीयांश शिक्षकांनाच देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम राहू दिलेला नाही. समान शैक्षणिक पात्रता आणि समान स्वरूपाचे काम करणाऱ्या सर्व पात्र शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या या याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाचा निर्णय कायम राहिला असून हजारो जिल्हा परिषद शिक्षकांना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने २०१६ मध्ये काढलेल्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शाळांमधील सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकविणाऱ्या केवळ एकतृतीयांश विषय शिक्षकांनाच पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ दिला जात होता. मात्र, समान शैक्षणिक पात्रता आणि समान स्वरूपाचे काम असूनही उर्वरित शिक्षकांना या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील शिक्षकांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते.

उच्च न्यायालयाने एकतृतीयांशची अट केली रद्द

या प्रकरणावर सुनावणी करताना न्या. मुकुलिका जवळकर आणि न्या. नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. समान शैक्षणिक पात्रता आणि समान काम करणाऱ्या सर्व पात्र विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तसेच एकतृतीयांश शिक्षकांपुरती मर्यादित असलेली अटही रद्द केली होती.

सर्वोच्च न्यायालयातही शिक्षकांची बाजू भक्कम

उच्च न्यायालयाच्या ८ मे २०२६ रोजीच्या निकालाला आव्हान देत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयात न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह आणि न्या. सुनीता अग्रवाल यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या याचिका फेटाळल्या. त्यामुळे सर्व पात्र शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश कायम राहिले आहेत.

थकबाकीसह वेतनश्रेणीचा लाभ मिळणार?

उच्च न्यायालयाने संबंधित शिक्षकांना नियुक्तीच्या तारखेपासून किंवा आवश्यक शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्याच्या तारखेपासून पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याचे निर्देश दिले होते. तसेच वेतनातील फरकाची थकबाकी आठ आठवड्यांच्या आत अदा करण्याचे आदेशही दिले होते. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. प्रदीप क्षीरसागर यांनी बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे समान कामासाठी समान वेतन या तत्त्वाला बळ मिळाले आहे. आता राज्य सरकार या निर्णयाची अंमलबजावणी कधी करते आणि पात्र शिक्षकांना वेतनश्रेणीसह थकबाकीचा लाभ कधी मिळतो, याकडे हजारो जिल्हा परिषद शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यातील ६ जिल्ह्यांत होणार नवीन अपर तहसीलदार कार्यालये; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, वाचा संपूर्ण यादी

Bank Holiday : उद्या बँकेत जाण्याआधी ही बातमी वाचा! २४ नोव्हेंबरला अनेक शहरांत बँका बंद

MSC Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव! 'एक्सलन्स इन सायबर सिक्युरिटी' पुरस्काराने सन्मान

Maharashtra News Live Update:कुर्ला फिनिक्स मॉल प्रकरणात मदरशाला पालिकेची नोटीस

शेतकरी दुष्काळात, गोकुळच्या सत्तासंघर्षासाठी वकिलांना दिले ८० लाख

SCROLL FOR NEXT