Parbhani Violence Saam Tv News
महाराष्ट्र

महायुती सरकारला 'सुप्रीम' झटका, पोलिसांवर गुन्हे दाखल होणारच, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट

Prakash Ambedkar at Supreme Court : परभणीत कोम्बिंग ऑपरेशनवेळी अटक केल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी नैसर्गिक मृत्यूचा दावा केला होता, परंतु कुटुंबीयांनी मारहाणीचा आरोप केला. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

Namdeo Kumbhar

  • सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिस कोठडीत झाल्याचा आरोप.

  • पोलिसांनी नैसर्गिक मृत्यूचा दावा केला, पण कोर्टात मारहाणीचा मुद्दा मांडला गेला.

  • मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

  • सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळत पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश कायम ठेवला.

Somnath Suryavanshi Death Case : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी नैसर्गिक मृत्यूचा दावा केला होता. मात्र, पोलिसांच्या मारहाणीमुळे कोठडीत त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप समोर आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. याविरोधात महायुती सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. हा निर्णय महायुती सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे या प्रकरणाशी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. (Supreme Court verdict on Somnath Suryavanshi custodial death )

महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे आणि उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे.
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली. सोमनाथ सूर्यवंशी यांची केस कोर्टात स्वत: प्रकाश आंबेडकर लढत आहेत, ते सुप्रीम कोर्टातही आज उपस्थित होते. सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीतच पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप आहे. सूर्यवंशी यांच्या आईने पोलिसांविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची बाजू मांडली होती. आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका फेटाळू लावत हायकोर्टाचा निर्णय कामय ठेवला. हा राज्य सरकारसाठी मोठा झटका मानला जातोय. त्यामुळे सोमनाथ यांचे कुटुंबीय आणि प्रकाश आंबेडकरांच्या लढ्याला मोठं यश मिळाले आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले ?

हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली आहे. हात झटकण्याचा सरकारचा प्रयत्न कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला होता. तसेच कोम्बिंग ऑपरेशनची नोंद कोर्टाने घेतली आहे. आता एसआयटी अथवा तपास अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाचा तपास करायचा, याचा निर्णय राज्य सरकार घेईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT