SUNETRA PAWAR TO RESHUFFLE NCP WOMEN'S WING? VAISHALI NAGDIVE LIKELY TO BECOME STATE PRESIDENT Saam Tv
महाराष्ट्र

सुनेत्रा पवार पक्षात भाकरी फिरवणार,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी कोणाची होणार नियुक्ती?

Reshuffle In NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेरनियुक्तांबाबत मुंबईतील देवगिरी बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीला छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार, सुनेत्रा पवार उपस्थित होते.

Bharat Jadhav

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाबाबत मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली.

  • सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे बैठकीला उपस्थित होते.

  • रुपाली चाकणकर यांच्या जागी वैशाली नागडवे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झालीय. ही बैठक मुंबईतील 'देवगिरी' या सरकारी निवासस्थानी झाली. या बैठकीत पक्षातील रिक्त पदे भरण्याबाबत आणि काही महत्त्वाच्या पदांवर फेरनियुक्त्या करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

या बैठकीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. आगामी निवडणुका आणि पक्षसंघटन बळकट करण्याच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या रात्री उशिरापर्यंत चाललेल्या खलबतांना पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे प्रामुख्याने उपस्थित होते.

या बैठकीत महिला प्रदेशाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली जाणार याची चर्चा झाली. भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांना महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,वैशाली नागडवे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

फेरनियुक्त्यांवर शिक्कामोर्तब?

देवगिरी बंगल्यात झालेल्या बैठकीत पक्षाची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत चर्चा झाली असून न महिला प्रदेशाध्यक्ष आणि युवक अध्यक्षपदासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला आहे.तर विद्यार्थी अध्यक्ष आणि युवती अध्यक्ष या पदांवर सध्या कार्यरत असलेल्यांनाच पुन्हा संधी देण्यात येणार आहे.

यानुसार महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे, विद्यार्थी अध्यक्षपदी आकाश झांबरे, युवक अध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. या संघटनात्मक बदलांमुळे पक्षाला नवीन बळ मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT