Narahari Zirwal, Maharashtra politics crisis  
महाराष्ट्र

Sunetra Pawar : मोठी बातमी! नरहरी झिरवळांवर सुनेत्रा पवारांची नाराजी, स्पष्ट शब्दातच म्हणाल्या...

Sunetra Pawar statement on Narhari Zirwal bribery case : मंत्रालयातील लाच प्रकरणावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर नाराजी व्यक्त केली. पक्षाची प्रतिमा आणि प्रशासनाची विश्वासार्हता जपण्याच्या सूचना देत त्यांनी कोअर कमिटी बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला.

Namdeo Kumbhar

Sunetra Pawar on Narhari Zirwal News : मंत्रालयातील लाच प्रकणात नरहाळी झिरवाळ यांच्या अडचणीत वाढ होतच आहे. आता याप्रकरणाची दखल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कारभारावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मंत्रालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंग याला ३५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. तो लिपिक झिरवाळ यांच्या कार्यालयात कामाला होता, त्यामुळे त्यांचेही नाव जोडले गेले. या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली होती. त्यामुळेच सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. (Sunetra Pawar statement on Narhari Zirwal bribery case)

लाच प्रकरण बाहेर आल्यानंतर मंत्री झिरवाळ नॉट रिचेबल होते. सोमवारी त्यांनी अखेर सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. पण सुनेत्रा पवार यांनी झिरवळ यांच्यासमोर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचं सांगत पवार यांनी मोजक्या नेत्यांच्या समोर झिरवाळ यांच्यावर नाराजी व्यक्त केली. (Mantralaya clerk bribe arrest political reaction)

सुनेत्रा पवार नेमकं काय म्हणाल्या?

मंत्रालयातील लाच प्रकरणावर झरवाळ यांच्यावर सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केली. स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही, याची काळजी घ्या, असा थेट सल्ला त्यांनी दिला. तसेच प्रशासन आणि अधिकारी बदनाम होणार नाही, याविषयी खबरदारी घ्या, अशी सूचनाही त्यांनी झिरवाळ यांना केल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.

नेमके प्रकरण काय?

मंत्रालयातील नरहरी झिरवाळ यांच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला एसीबीने ३५ हजारांची लाच घेतना रंगेहाथ अटक केली होती. अटकेची कारवाई केल्यानंतर त्याच्या कार्यालयातून काही रोकड जप्त करण्यात आली. नाशिकमधील त्याच्या घरातही महत्त्वाची कागदपत्रे मिळाली. त्यातच या प्रकरणात झिरवाळ यांच्यावर विरोधकांकडून आरोपांच्या फैरी सुटल्या. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत असल्याचे लक्षात येताच सुनेत्रा पवार यांनी सोमवारी कोअर किमिटीची बैठक बोलवली होती. या बैठकीत त्यांनी झिरवाळ यांच्यावर नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT