Deputy Chief Minister Sunetra Pawar after being appointed Guardian Minister of Beed and Pune districts saam tv
महाराष्ट्र

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवार पुणे आणि बीडच्या पालकमंत्री, शासन निर्णय जारी

Deputy CM Sunetra Pawar News Update : अजित पवार यांच्या निधनानंतर बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली.

Ganesh Kavade

Sunetra Pawar appointed guardian minister of Beed and Pune : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी कुणाकडे जाणार? याची राजकीय चर्चा सुरू झाली होती. बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. बीड आणि पुण्याचे पालकत्व आजपासून सुनेत्रा पवार यांच्याकडे राहणार आहे. (Beed Pune guardian minister latest government decision)

महाराष्ट्र राज्य सरकारने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत सुनेत्रा अजित पवार यांची पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागांवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने आज (३ फेब्रुवारी २०२६) यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जारी केलाय.

Deputy CM Sunetra Pawar News Update

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद होते. मात्र, त्यांच्या आकस्मिक निधनामुळे ही पदे रिक्त झाली होती. प्रशासकीय कामकाज सुरळीत चालण्यासाठी तातडीने ही नवी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये विकासकामांना गती देणे आणि स्थानिक प्रशासनावर पकड मिळवणे हे आता नवनियुक्त पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोरील मुख्य आव्हान असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

आरसीबीच्या विजयानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; पॉइंट टेबलमध्येही मोठा उलटफेर

Monday Horoscope: पैशाच्या समस्या कमी होतील, ५ राशींसाठी भरभराटीचा दिवस; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT