Uddhav Thackeray News saam tv
महाराष्ट्र

Sulochana Latkar: उद्धव ठाकरेंनी वाहिली सुलोचना दीदींना आदरांजली; म्हणाले, सिनेसृष्टीची 'आई' गेली...

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी देखील सुलोचना दीदींनाल भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असून सिनेसृष्टीची 'आई' गेली असं म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Sulochana Latkar Dies: आपल्या भारदास्त अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांनी (४ जून) रोजी या जगाचा निरोप घेतला. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. सुलोचना दीदी यांच्या निधनाने चाहत्यांना अश्रू अनावर झालेत. उद्धव ठाकरे यांनी देखील सुलोचना दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असून सिनेसृष्टीची 'आई' गेली असं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

सुलोचना दीदींच्या निधनामुळे सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील शोक व्यक्त करत म्हटल आहे की, "सुलोचनादीदी गेल्य, मराठी आणि हिंदी रूपेरी पडद्यावरील मांगल्य हरपले. आज संपूर्ण सिनेसृष्टीची 'आई' कायमची पडद्याआड गेली, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे."

आपल्या शोकभावना व्यक्त करताना उद्धव ठाकरे म्हणाले, " मराठी सिनेमाच्या सुवर्ण काळाच्या त्या बहुधा अखेरच्या साक्षीदार. त्यांचा एकूणच जीवनपट खूपच संघर्षमय होता. आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार पटकावले. सिनेसृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा 'दादासाहेब फाळके' पुरस्कार देऊन त्यांचा गौरव व्हावा, अशी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती."

"ठाकरे परिवाराशी तर सुलोचनादीदींचा अत्यंत निकटचा स्नेह होतं. समोर येताच पायाला हात लावावा असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. अभिनेत्री ते चरित्र अभिनेत्री असा त्यांनी प्रवास केला. पण 'मोलकरीण' या सिनेमातून 'आई'ची भूमिका साकारली आणि तीच त्यांची ओळख बनली. आज संपूर्ण सिनेसृष्टीची 'आई'च काळाच्या पडद्याआड गेली आहे. मी संपूर्ण शिवसेना परिवारासह त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानचा 24वा हप्ता कधी खात्यात येणार? कॅबिनेट बैठकीतून समोर आली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

SCROLL FOR NEXT