Shirdi Vikhe Patil’s remarks on the temple meal system spark a fresh debate amid rising local crime incidents. Saam Tv
महाराष्ट्र

शिर्डीत वाढत्या गुन्हेगारीला प्रसादालय जबाबदार? विखेंच्या विधानानं नवा वाद

Connection Between Shirdi Temple Meal And Rising Crime: साईच्या शिर्डीत जेवणाच्या प्रसादामुळे गुन्हेगारी वाढतेय... होय असं आम्ही का म्हणतोय... शिर्डीतील प्रसादालयावर विखे पाटीलांनी नेमकं काय विधान केलंय? शिर्डीतील गुन्हेगाराची सद्यस्थिती काय आहे?

Suprim Maskar

दुहेरी हत्याकांडामुळे शिर्डीतील वाढती गुन्हेगारी चर्चेचा विषय झाली होती... अशातच आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुजय विखेंनी साई संस्थेच्या प्रसादालयाबाबत अजब विधान केलयं... लापशी आणि घुगऱ्या हा खरा प्रसाद असतो... पोळी, भात, वरण मिठाई हे जेवण आहे..असं विधान करत विखेंनी थेट शिर्डीच्या गुन्हेगारीवर बोट ठेवताना मंदिरातल्या प्रसादलयाला त्यासाठी जबाबदार ठरवलंय...विखे काय म्हणाले ऐका...

मुळात रात्री दारू पिऊन लोक प्रसाद खायला जातात, साईभक्त म्हणून फिरणारे साईभक्त नाहीत... हे विखेंना सुचवायचं होतं... मात्र शिर्डीतील गुन्हेगार साई मंदिरातील जेवण जेवतात आणि बाहेर गुन्हेगारी करतात... अस विखेंनी थेट सांगितलयं...त्यामुळे विखेंच्या या विधानानं नव्या वादाला तोंड फुटलयं....नजर टाकूया शिर्डीतल्या वाढत्या गुन्हेगारीवर

गेल्या वर्षभरात दुचाकी चोरी, चैनस्नॅचिंग, पाकिटमारी, भाविकांची आर्थिक फसवणूक अशा घटनांमध्ये शिर्डीत वाढ झालीय...पाकिटमारीसाठी लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात वापर गुन्हेगारी टोळ्याकडून केला जातोय..यात दुसऱ्या जिल्ह्यातील आणि बाहेर राज्यातील गुन्हेगारही शिर्डीत आश्रयला आलेत शिर्डीतील भिकाऱ्यांची संख्याही 150 ते 200 च्या वर पोहचलीय..

सुजय विखे पाटलांनी याआधीही शिर्डीतील साईबाबा मंदिरातील मोफत जेवण बंद करून तो पैसा मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी वापरावा, असं विधान केलं होतं... त्यावेळी विरोधकांनी विखेंच्या विधानावर चांगलीच टीका केली होती... अशातच आता विखेंनी प्रसादाला जेवण म्हणून या साईबाबांच्या प्रसादाचा संबंध थेट गुन्हेगारीशी जोडल्यानं साई संस्थान नेमकं काय भूमिका घेतं... हे पाहणं महत्त्वाचं आहे... मात्र विखेंनी केलेल्या विधानाकडे केवळ श्रध्देच्या भावनेने न बघता त्यांचा सल्ला सबुरीने घेणं गरजेचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कोल्हापूर महानगर पालिका निवडणूक, जनसुराज्य शक्ती – आरपीआय – पीआरपी यांचा ‘सुराज्य संकल्प’ जाहीरनामा जाहीर

आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल, पाहा VIDEO

IND vs NZ : फिलिप्सची बाप फिल्डिंग; रोहित-गिल झाले शॉक, प्रेक्षकांची वाढली धकधक | Video

SCROLL FOR NEXT