खोदकामात गुप्तधन सापडले साम टीव्ही
महाराष्ट्र

गुप्त धनाने बळी घेतलाच! वाटा न मिळाल्याने मजुराची आत्महत्या

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर ः श्रीरामपूर येथे पडक्या वाड्यात सापडलेल्या गुप्त धनाच्या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. गुप्त धनाबाबत आपल्याकडे अनेक समज आणि गैरसमज आहेत. गुप्त धन शक्यतो कोणालाच पचत नाही. ते बळी घेते, अशी ग्रामीण भागात समजूत आहे. परंतु या धनाच्या हव्यासापोटी अनेकजण निर्घृणपणे लोकांचा बळी घेत असतात.

खोदकाम करताना सापडलेल्या गुप्तधनातून अकरा लाख रुपये देण्याचे आश्‍वासन देऊन पैसे देण्यास नकार दिला, तसेच मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची फिर्याद मृताच्या पत्नीने शहर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी बेलापुरातील दोघांवर काल (मंगळवारी) रात्री आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

मृत सुनील गायकवाड यांच्या पत्नी वंदना यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की वटपौर्णिमेच्या दिवशी पती सुनील गायकवाड हे दोन मजुरांना सोबत घेऊन खटोड यांच्या घराच्या परिसरात वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्यासाठी गेले होते. घरी आल्यावर त्यांनी, ‘खटोड यांच्या घराच्या परिसरात खड्डा खोदताना तांब्याचा हंडा सापडला. त्यात सोन्या-चांदीची नाणी असल्याने, कोणाला सांगू नये म्हणून राजेश व हनुमंत खटोड आपल्याला ११ लाख रुपये देणार आहेत,’ असे सांगितले.

त्यानंतर माझे पती पैसे मागण्यासाठी गेले असता, खटोड यांनी पैसे न देता त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तेव्हापासून ते मानसिक तणावाखाली होते. त्यामुळेच त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेश खटोड व हनुमंत खटोड यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक कृष्णा घायवट यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाहीत, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 'हे' व्यायम नक्की करून बघा

SCROLL FOR NEXT