Sugar Cane Protest Pandharpur भारत नागणे
महाराष्ट्र

Pandharpur News: पंढरपुरात ऊस दर आंदोलनाला हिंसक वळण; ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्सचे टायर फोडले

Sugar Cane Protest: श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या चार ट्रॅक्टरचे 40 टायर अज्ञात लोकांनी फोडले आहेत.

भारत नागणे

Pandharpur News: ऊस दराच्या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ऊस दर संघर्ष समितीने आंदोलन पुकारले आहे. ‌या आंदोलनाला रात्री पंढरपूर (Pandharpur) तालुक्यात हिंसक वळण लागले. श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे ऊस (Sugar Cane) घेऊन जाणाऱ्या चार ट्रॅक्टरचे 40 टायर अज्ञात लोकांनी फोडले आहेत. यामध्ये ट्रॅक्टर मालकाचे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे. (Sugar Cane Price Protest News)

ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये जाहीर करावी अशी मागणी ऊसदर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आंदोलनची हाक देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी ऊसतोडी बंद करून ऊस वाहतूक करू नये असे आवाहन ऊसदर संघर्ष समितीकडून केले गेले होते. मात्र त्यानंतरही ऊस वाहतूक सुरू होती. दरम्यान काल बुधवारी रात्री अज्ञातांनी रात्री ऊस वाहतूक रोखण्यासाठी ट्रॅक्टरचे टायर फोडले आहेत. या प्रकारामुळे ऊसदर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

SCROLL FOR NEXT