SUGAR PRICE HIKE CUTTING CHAI PRICE DOUBLES FROM ₹10 TO ₹20 saam tv
महाराष्ट्र

चहाप्रेमींना मोठा झटका! साखर महागली अन् चहा कडवटला; कटिंगच्या कपाला दुप्पट भाव

Tea Becomes Expensive : साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने चहाच्या दरावरही परिणाम झाला आहे. दहा रुपयांचा कटिंग चहा आता 20 रुपयांवर पोहोचल्याने चहाप्रेमींच्या खिशाला फटका बसला आहे.

Bharat Jadhav

  • साखरेच्या दरवाढीचा थेट परिणाम चहाच्या दरावर झाला आहे.

  • 10 रुपयांचा कटिंग चहा काही ठिकाणी थेट 20 रुपयांवर पोहोचला आहे.

  • 60 ते 70 रुपये किलो साखरेच्या दरामुळे गृहिणींच्या बजेटवरही परिणाम होत आहे.

गणेशोत्सव, दहीहंडी, पोळा सारखे सण तोंडावर आले असतानाच साखरेच्या दरात मोठी वाढ झालीय. गोडधोडाच्या सणांवर साखरेच्या वाढत्या दरांचे कडवटपणा आलाय. किरकोळ बाजारात साखर 60 ते 70 रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने गृहिणींचे बजेट देखील कोलमडले आहे. साखरेच्या वाढत्या दरामुळे आता चहाच्या कटिंग कपचे दरही महागलेत.

सकाळची चहाची तलफ आता खिशाला चटका देणार आहे. गेल्या आठ दिवसांत साखरेच्या दरात झपाट्याने वाढ झाल्याने चहा कॅटिंग चालकांनी दर वाढवलेत. दहा रुपयांचा कटिंग चहा आता थेट वीस रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे चहाप्रेमींच्या कपात चहा कमी आणि महागाईची कडवट चव अधिक जाणवणार आहे.

श्रावणात उपवास, नैवेद्य आणि सणासाठी गोड पदार्थांना मोठी मागणी असते. लाडू, पुरणपोळी, खीर, बासुंदी यासाठी लागणारी साखरच महाग झाल्यानं लोकांच्या ताटातील पुरणपोळी गायब झालीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेच्या दरात20 ते 25 रुपयांनी वाढ झाली आहे.

सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

साखर 7 हजार 500 प्रति क्विंटलवर गेलीय. तर वाशिम जिल्ह्यात किरकोळ बाजारात साखरेचे दर 80 रुपयांवर गेलेत. याचा ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसतोय. साखर दरवाढीनंतर आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी काही सवाल उपस्थित करत सरकारकडे मोठी मागणी केली आहे. साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद आहे.

साखरेचे दर वाढले तर माझ्यासारख्या नेत्याला आनंद झाला असता, मात्र हे पैसे शेतकऱ्यांना नाहीतर व्यापाऱ्यांच्या घशात जाणार आहेत. दिवाळीपर्यंत पुरेल इतका साखरेचा साठा यंदाच्या हंगामातील आहे आणि पुढील उत्पादन देखील देशाला पुरेल इतकं असताना अचानक दर कसे काय वाढले असा गंभीर सवालही त्यांनी यावेळी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT