Ladki Bahin Yojana SAAM TV
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले का? डिसेंबरचे ₹ १५०० कधी जमा होणार? वाचा नेमकी माहिती

Sudhir Mungantiwar on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबद्दल अफवा पसरण्याचं काम सुरू आहे. मुळात या योजनेच्या निकषात कोणतेही बदल झालेले नाहीत. डिसेंबरचे पैसे लवकरच खात्यात जमा होतील.

Bhagyashree Kamble

लाडकी बहीण योजनेच्या निगडीत अनेक बातम्या समाजमाध्यमांवर पसरत आहेत. ज्यात अर्जांची छाननी करून निकषात बसणाऱ्या महिलांच्याच बँक खात्यात मासिक रक्कम जमा होईल. असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. सध्या लाडक्या बहिणी, योजनेचे १५०० ही रक्कम बँक खात्यात कधी जमा होईल, याच्या प्रतिक्षेत आहेत. अशातच माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठी माहिती दिली आहे.

लाडकी बहीण योजनेबद्दल अफवा पसरण्याचं काम सुरू आहे. मुळात या योजनेच्या निकषात कोणतेही बदल झालेले नाहीत. डिसेंबरचे पैसे लवकरच खात्यात जमा होतील. असा खुलासा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. याबाबात मुख्यमंत्र्यासोबत माझी चर्चा झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच मंत्रीमंडळ विस्तार आणि ऑपरेशन लोटसबाबतीतही त्यांनी भाष्य केलं आहे.

मंत्रिमंडळांचा विस्तार लवकरच होणार

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. माध्यमात आतापर्यंत इतक्या तारखा दाखवण्यात आल्या आहेत. आणखी दोन तीन तारखा दाखवा, असं उपरोधिक टोला मुनगंटीवारांनी लगावला. फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. त्यासाठीच चर्चा आणि संवाद सुरू आहे. त्यातून काही गोष्टी पुढे येतील, असेही ते म्हणाले.

ऑपरेशन लोटस

सध्या मविआतील आमदार महायुतीच्या नेत्यांना भेटत असल्याचा दावा अनेक नेत्यांनी केला. तसेच भाजपकडून मिशन लोटस राबवण्यात येत असल्याचंही काही नेत्यांचं म्हणणं आहे. 'कुणी आमदार किंवा खासदार आमच्याकडे येत असेल, तर त्याला षडयंत्र कसे म्हणता येईल? माविआचे आमदार - खासदार सूर्यफुलासारखे आहेत. सत्तेचा सूर्य दिसल्यावर ते त्या बाजूने झुकणारच, असे सूचक विधान मुनगंटीवार यांनी केले आहे.' महाविकास आघाडीतील आमदार खासदारांना फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस राबवले जात असल्याच्या चर्चांवर त्यांनी उत्तर दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: भयाण! अंगभर मुंग्या, भूकेने व्याकूळ बालिकेची जीवनासाठी झुंज; दोन ट्रॅव्हल्सच्यामध्ये सापडली नवजात बालिका

Maharashtra Live News Update: कल्याण पश्चिममधील अनुपम नगर परिसरातील घरावर झाड पडल्याने ३ घरांचे नुकसान

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT