Sudhir Mungantiwar Raises Objection Over Winter Session Duration Before CM Fadnavis Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Winter Session: "इंग्रजांपेक्षा आपलं सरकार वाईट..." मुख्यमंत्र्यांसमोरच मुनगंटीवार संतापले; नेमकं काय घडलं?

Sudhir Mungantiwar Statement : महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान होणार आहे. मात्र, दोन आठवड्यांचा कालावधी अपुरा असल्याचे सांगत सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली.

Namdeo Kumbhar

Sudhir Mungantiwar demands three week winter session : विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या मुदतीवरून कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाले. नागपूर येथे होणारे हे अधिवेशन अवघ्या दोन आठवड्यांचे (७ डिसेंबर ते १८ डिसेंबर) ठेवण्यात आल्याने भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आक्रमक भूमिका घेत, "इंग्रजांपेक्षा आपलं सरकार वाईट असा मॅसेज बाहेर जायला नको," अशी परखड भूमिका त्यांनी मांडली.

तीन आठवड्यांच्या अधिवेशनाची मागणी

दोन आठवड्यांचे अधिवेशन कामकाजासाठी अत्यंत अपुरे आहे, असे सांगत मुनगंटीवार यांनी किमान तीन आठवड्यांचे अधिवेशन घेण्याची मागणी केली. या अल्प मुदतीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रस्तावापर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा आणि न्याय मिळणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. बैठकीत शेतकर्‍यांचे प्रश्न आणि सावरकरांच्या ठरावासह सर्वच मुद्दे वाचून दाखवत त्यांनी अधिवेशनाची मुदत वाढवण्यावर भर दिला.

धान उत्पादक शेतकरी आणि इतर मुद्द्यांवर आक्रमक

दुष्काळ आणि विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, शासनाने अद्याप धानाचा बोनस जाहीर केलेला नाही. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना तातडीने धानाचा बोनस जाहीर करण्यात यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

अध्यक्ष आणि मुनगंटीवार यांची स्पष्टोक्ती

या सर्व घडामोडींवर स्पष्टीकरण देताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, नेहमीप्रमाणे ७ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होईल आणि सध्या दोन आठवड्यांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, वेळ पडल्यास आणि गरज भासल्यास अधिवेशन पुढे वाढवले जाऊ शकते.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले की, जर दोन आठवड्यांचा कालावधी कामकाजासाठी कमी पडला, तर दिवस वाढवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेतली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर स्टंटबाजी करणाऱ्या पाच जणांना अटक; अंधेरी पोलिसांची कारवाई, पाच दुचाकी जप्त!

Moss Removal : घराच्या गच्चीवर, अंगणात आणि भिंतींवर शेवाळ साचलंय? जाणून घ्या शेवाळ काढण्याचे सोपे घरगुती उपाय

Maharashtra News Live Update: महापौर दालनाच्या बाहेर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नगरसेवक यांचे आंदोलन

EPS-95 Pension : मोठी बातमी! १९ नोव्हेंबरला EPFO ची महत्त्वाची बैठक; पेन्शन नाकारली जाऊ नये म्हणून समोर ठेवल्या 'या' १० मोठ्या मागण्या

अदरक सोलण्याची सर्वात सोपी ट्रिक, सुरीऐवजी वापरा चमचा

SCROLL FOR NEXT