Success Story Saam Digital
महाराष्ट्र

Success Story: लाकडी तेल घाण्यातून लाखोंची उलाढाल...डॉक्टरांचा सल्ला ठरला मोलाचा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Success Story

कोरोना काळात अनेकाच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बुडाल्यामुळे आयुष्य उद्वस्त झालं. गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच याची झळ बसली. मात्र याच कोरोनामुळे अनेकांना नवीन संधी मिळाल्या. छोटे मोठे उद्योग सुरू केल्यामुळे हाताला काम मिळालं. यातीलच एक परभणीचे मनोज आगलावे पाटील. महामारीच्या काळात तेही कोरोनाबाधित झाले होते. त्यावेळी कोरोना म्हणजे कोणाच्याही काळजाचा ठोका चूकेल अशी परिस्थिती होती. मनोज पाटील मात्र या आजारातून बरे झाले. या आजारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना रोजच्या आहारात एक पदार्थ समाविष्ट करण्याचा सल्ला दिला आणि मनोज पाटील यांनी त्याचा व्यवसाय केला.

मनोज पाटील कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाधित झाले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना आहारामध्ये लाकडी घाण्यावर निर्मित तेलांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतरच त्यांनी डीच वर्षांपूर्वी लाकडी घाण्यावर आधारित तेलनिर्मिती उद्योग सुरू केला आणि आज या व्यवसायातून वार्षिक लाखोंची उलाढाल होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज पाटील यांनी पुणे येथून तीन लाख रुपये किमतीचे लाकडी घाणा संयंत्र खरेदी केले. शेंगदाणा व सूर्यफूल तेल ही त्यांची मुख्य उत्पादने आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून हा व्यवसाय सुरू केला आहे. आता ते सूर्यफूल, भुईमूग आणि करडई या तेलाची ते निर्मिती करतात. यासाठी त्यांनी पत्नी नंदिनी, मेहुणे अंगद काळबांडे यांच्या सोबत पुणे येथे दोन दिवसांचे तेल घाणा उद्योगाचे प्रशिक्षण घेतले.

परभणी शहरातील गणपती चौकात आपल्या दुकानाच्या माध्यमातून तेलाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी शेंगदाणा व करडई तेलांच्या निर्मितीवर विशेष भर दिला असून परभणीत त्यांनी विक्रीसाठी ‘आउटलेट’ही सुरू केले आहे. शहर व परिसरात त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या तेलाची प्रसिद्धी केली. त्यांनी स्वतःचे आउटलेट व चार जिल्ह्यांमधील ‘सुपर शॉपी’च्या माध्यमातून पार्थ या ब्रॅण्डने उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली. कोरोना काळापासून त्यांची या व्यवसायातून वार्षिक लाखोंची उलाढाल सुरू आहे. त्यांची वडिलोपार्जित अडीच एकर शेती असून या व्यवसायासोबत त्यांनी शेतीही सांभाळली आहे.

अपयश, परिस्थितीमुळे निराश होणाऱ्या तरुण आणि होतकरूंनी मनोज पाटील यांच्या या व्यवसायातून आदर्श घेण्याची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT