Success Story Saam Tv
महाराष्ट्र

Success Story: घर नाही तालीम नाही, नंदी बैल फिरवणाऱ्याच्या लेकाने पटकावलं सुवर्णपदक; कुस्तीपटू सनी फुलमाळीचा प्रवास

Success Story of Wrestler Sunny Phulmali: लोहगावच्या तरुणाने आशियाई युवा क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. त्यांनी खूप मेहनत घेऊन कुस्तीत चांगली कामगिरी केली आहे.

Siddhi Hande

सागर आव्हाड, साम टीव्ही प्रतिनिधी

दंगल चित्रपटाला साजेशी अशी ही कहाणी आहे पुण्यातील लोहगाव परिसरामध्ये राहणाऱ्या सनी फुलमाळीची आहे. दंगल चित्रपटात तीन मुलीसाठी वडील काय प्रयत्न करतात.. हे आपण पाहिलं आहे मात्र तशीच सेम कहानी सनीच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते.. घर नाही ,तालीम नाही, नंदीबैल घेऊन दारोदारी भविष्य सांगणाऱ्या वडिलांनी आपल्या तीनही मुलांना पहिलवान बनवलं. मुलाचा खेळ पाहून वडिलांनी नंदीबैल ही विकून टाकले आणि मुलाला तालमीत पाठवला.

आई सुया फनी दारोदार विकते तर वडील नंदीबैलाचा व्यवसाय करत होते. एका माळरानावरती राहणारा हे फुलमाळी कुटुंब आहे. तुम दोघांचे नाव काय आहेत. भैय्या, बादल आणि सनी असे तीन भाऊ आहेत. मात्र सनी चांगले खेळतो हे या ठिकाणी राहणाऱ्या सदाशिव राखपसरे यांनी पाहिलं आणि सनीच्या प्रवासाला सुरुवात झाली

लोहगावच्या रानात पडीक जमिनीवर सुभाष फुलमाळी हे आपल्या तिन्ही मुलांची प्रॅक्टिस घेत होते. या प्रॅक्टिससाठी त्यांनी त्यांची नंदीबैलही विकले.. आणि मुलांना कुस्तीमध्ये पाठवलं.. वडील लोहगावातील झोपडीत राहून दारोदारी नंदी बैल घेऊन भविष्य सांगत तर आई,.बहीण सुई दोरा विकून उदरनिर्वाह करणाऱ्या झोपडीतील १७ वर्षीय युवकाने बहरैन देशात येथे झालेल्या एशियन युथ कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले आहे. परिस्थिती वर मात करून लोहगाव ते बहरैन देशा पर्यंत कुस्ती खेळणाऱ्या १७ वर्षीय वय व ६० किलो वजनी गटातील आंतरराष्ट्रीय युथ स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता सनी सुभाष फुलमाळी याचा प्रवास थक्क करणारा असा आहे.

पै. सनी फुलमाळी याचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील आष्टी येथील आहे. हे कुटुंबीय मागील पंधरा वर्षांपासून लोहगाव मध्ये रहायला आहेत. फुलमाळी परिवाराचा मूळचा परंपरागत व्यवसाय हा नंदीबैल घेऊन दारोदारी फिरून त्यावर उपजीविका करणे हा आहे. वडील सुभाष माळी आजही नंदीबैल घेऊन गावोगावी जातात. तर सनी ची आई, बहीण सुई दोरा विकते. मोठा भाऊ शिक्षण घेत आहे. याच कुटुंबात वाढलेल्या सनी हा कुस्ती खेळात तरबेज होता. ही चुणूक ओळखून लोहगाव मधील रायबा तालीम मध्ये पै. सोमनाथ मोझे, पै. सदा राखपसरे यांनी सनी ला कुस्ती चे धडे देण्यास सुरवात केली. त्याचे कुस्ती तील डावपेच ओळखून त्याला खेळण्यासाठी लोणीकंद येथील जाणता राजा तालमीत संदीप भोंडवे यांच्या तालमीत पाठविला. सनी ची परिस्थिती पाहून संदीप भोंडवे यांनी त्याचा पूर्ण खर्च उचलण्याची तयारी दर्शवली. आणि ती ते पार देखील पाडत आहेत.

सनीने नुकत्याच बहरैन देशात झालेल्या एशियन युथ कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून लोहगाव सह देशाचे नाव आशियाई देशात केले आहे. याबाबत सनी फुलमाळी म्हणाला, घरची परिस्थिती हलाखीची होती. आपल्याला वस्ताद संदीप भोंडवे यांनी दत्तक घेतले. आणि खर्च केला. बाहेरून शिक्षण चालू असून सध्या दहावी मध्ये शिकत आहे. महाराष्ट्र चॅम्पियन स्पर्धा जिंकल्यानंतर मी नॅशनल स्पर्धेत पराभूत झाल्यावर मला सिल्वर मेडल मिळाले होते. यानंतर एशियन युथ गेम मध्ये आपली निवड झाली. मी इराक, इरान, जपान, कोरिया आदी देशातील खेळाडू सोबत सहा वेळा कुस्ती केल्या नंतर मला गोल्ड मेडल मिळाले आहे. आता आपले स्वप्न ऑलम्पिक स्पर्धा जिंकण्याचे आहे.

वडील सुभाष फुलमाळी म्हणाले, सनी किंवा त्याच्या भावाने आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत चमकावे अशी इच्छा होती. ती इच्छा सनी ने पूर्ण केल्याने आपल्यासह कुटुंबाला खूप आनंद झाला आहे. सनी तालमीत सराव करताना खूप चलाखी दाखवत होता. त्याचा खेळ चांगला होता. पण परिस्थिती आडवी येत होती. त्यामुळे संदीप भोंडवे यांच्याकडे त्यास दत्तक देऊन पुढील जबाबदारी त्यांच्यावर सोपविली होती. त्यामध्ये सनी यशस्वी झाल्याने रायबा तालमीचे नाव सर्वत्र पोहोचले.

त्याच्या दोन्ही भावांना दत्तक घेण्यात यावं तेही चांगला खेळ करतील असा विश्वास सनीने व्यक्त केला .. या पुढील काळात आम्हाला जर मदत केली तर आम्ही देशासाठी खेळ असा विश्वास च्या भावाने व्यक्त केला. सनीने ऑलिंपिक खेळाडू असा विश्वास त्याचे आई व्यक्त करते .. सरकारने नोकरी द्यावी व मदत करावी म्हणजे मला ही सगळी परिस्थिती बदलवता येईल असं त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे.

बहरीन येथे पार पडलेल्या आशियाई युवा क्रिडा स्पर्धेत लोहगावचा कुस्तीपटू सनी फुलमाळी याने कुस्ती स्पर्धेत साठ किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या कामगिरीने केवळ आपल्या कुटुंबाचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची मान त्याने अभिमानाने उंचावली आहे. कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वास यांची शिदोरी घेऊन लोहगावमधील १७ वर्षीय सनी फुलमाळी याने परिस्थितीवर मात करत इतिहास रचला आहे.

मुळ बीडचं असलेलं फुलमाळी कुटुंब उदरनिर्वाहाकरिता काही वर्षांपूर्वी लोहगावात आलं. येथे एका झोपडीवजा घरात राहू लागलं. झोपडीत राहणाऱ्या सनीच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील नंदी बैल घेऊन गावोगावी भविष्य सांगण्याचे काम करतात, तर आई सुया-दाभण विकून संसाराचा गाडा ओढते. तरीही या परिस्थितीने सनीची स्वप्ने मरू दिली नाहीत.

लोहगाव येथील रायबा तालमीत वस्ताद सोमनाथ मोझे आणि सदाशिव राखपसरे यांच्या मार्गदर्शनातून त्याने कुस्तीचे धडे घेतले. त्याची खेळाडू वृत्ती आणि अंगमेहनत पाहून त्याला लोणीकंद येथील जाणता राजा कुस्ती केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे वस्ताद संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेऊन त्याने स्वत:ला तयार केले. कष्ट आणि चिकाटीची गोष्ट सांगणारा सनी आज हजारो तरुणांसाठी जिवंत प्रेरणा बनला आहे. 'परिस्थिती कशीही असो, जर मनात जिद्द असेल तर स्वप्ने नक्कीच साकार होतात.' हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे.

सनी आता दहावीमध्ये शिक्षण घेत असून त्याचा हा झोपडीतून सुवर्णपदकापर्यंतचा प्रवास संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्याच्या या यशामुळे लोहगावसह पुणे जिल्हा अभिमानाने उजळला आहे. सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. सनीला पुढील प्रशिक्षणासाठी शासनाने विशेष मदत व राष्ट्रीय स्तरावरील तयारीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT