Success Story Saam Tv
महाराष्ट्र

MPSC : लेकींनी नाव कमावलं, गॅरेजवाल्याच्या दोन्ही मुली झाल्या सरकारी अधिकारी; मंत्रालयात पोस्टिंग; सोलापूरात होतंय कौतुक

Solapur Girls Crack MPSC Success Story: सोलापूरच्या संजिवनी आणि सरोजिनी भोजने यांनी एमपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. या दोघींची मंत्रालयात अधिकारी म्हणून पोस्टिंग झाली आहे.

Siddhi Hande

घरची आर्थिक परिस्थितीमुळे पाचवी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या वडीलांनी छोट्या गॅरेज व्यवसायावर सहा माणसाचं कुटुंब चालवत दोन मुलींना शिक्षण दिल. त्यामुळे सोलापूरच्या गवळी वस्ती सारख्या झोपडपट्टीत पत्र्याच्या घरात अभ्यास करुन दोन सख्या भगिनींनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे.

संजीवनी आणि सरोजिनी भोजने अशी एमपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या त्या दोन सख्ख्या भगिनींची नावे आहेत.तर गरीब परिस्थितीतून मुलींना शिक्षण देणारे ज्योतीराम आणि रेश्मा भोजने अशी आई-वडिलांची नावे आहेत.

जोतिराम भोजने यांनी पाचवी पर्यंत शिक्षण घेतले असून गॅरेज चालक अशी वडीलांची ओळख आहे.घरची गरीब स्थिती असताना देखील वडिलांनी शिक्षण शिकवल्यानेच हे यश मिळाले असल्याच्या भावना संजीवनी आणि सरोजिनी यांनी व्यक्त केल्या आहेत.

घरची परिस्थिती हलाखीची असतानाही दोघी भगिनींनी बीकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण केले.2018 पासून दोन्ही भगिनींनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली आहे.दररोज किमान 6 ते 7 तास सोलापुरात अभ्यास करुन त्यांनी या परीक्षेत यश मिळवलय.काल महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा निकाल हाती आल्यानंतर त्यांना ही आनंदाची बातमी समजली.

यामध्ये संजीवनी भोजने यांना मंत्रालयात महसूल सहाय्यक तर सरोजणी भोजने यांना कर सहाय्यक पोस्टिंग मिळाली आहे.त्यामुळे सध्या भोजने कुटुंबियांचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे.अतिशय हलाकीच्या परिस्थितीतून या दोन भगिनींनी मिळवलेल्या या दैदीप्यामान यशाच सोलापूरमध्ये सर्वत्र कौतुक होत असल्याच चित्र दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swine Flu : स्वाइन फ्लूचा धोका वाढलाय; रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्या 'हे' ३ हेल्दी ड्रिंक्स

Gold Rate Today: सोन्यानं नवा उच्चांक गाठला! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी वाढ, वाचा 18k-22k आणि 24k चे दर किती?

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! १८,००० असणारा बेसिक पगार थेट ₹६८,९४० होणार? मोठी अपडेट समोर

Sleep Jerks: झोपेत असताना अचानक झटका का लागतो?

Maharashtra News Live Update: माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केला एसटी बसमधून प्रवास

SCROLL FOR NEXT