Nashik Farmer Agitation Dada bhuse 
महाराष्ट्र

Farmer Agitation: सहाव्या बैठकीनंतर शेतकरी आंदोलनाला यश; ८ दिवसात सरकारसोबत ६ बैठका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तरबेज शेख, नाशिक

Farmer Agitation Success :

नाशिकमध्ये सुरू असलेला शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर ८ दिवसांनी मिटले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांची शिष्टाई फळाला आलीय. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडून ३ महिन्याचा अवधी मागितलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी फोनवरून संवाद साधला. शेतकऱ्यांच्या मागणी पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आंदोलक शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

दरम्यान पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या मागणी पूर्ण करण्याची जबाबदारी घेतलीय. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गेल्या आठ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. अखेर प्रशासनासोबत झालेल्या सहाव्या बैठकीत आंदोलनावर यशस्वी तोडगा निघाला.

काही विषय जिल्हा तर काही राज्य आणि केंद्र पातळीबरचे होते. जिल्ह्या पातळीचे काम सुरू करण्यात आलंय. राज्याचे प्रश्नबाबत अनेक मंत्री महोदयांच्या उपस्थित चर्चा झाल्या. मुख्यमंत्रीसोबत शिष्टमंडळाची बैठक संपन्न झाली होती. तीन महिन्यात काम मार्गी लागल्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांचे अनेक विषय सोडवण्यात प्रगतीपथावर आहेत. आज बैठकीत मुख्यमंत्री यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचं फोनवरून बोलणे करून दिलं. जे. पी. गावीत यांचे समाधान झाले असून शासन सकारात्मक आहे.

कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. सातबाऱ्याच्या विषयावर अभ्यास सुरू आहे. घरकुल बाबतही बोलणे झाले आहे, त्यांना शबरी योजनेत घरे देऊ. कांद्याबाबत निर्देश केंद्र देत असते. दरम्यान त्यावर शासनपातळीवर चर्चा सुरूय. अंगणवाडी, मदतनीस यांचा विषय असेल. २००५ नंतरच्या शासकीय कर्मचारी यांना जुनी पेन्शनबाबत मागणी आहे. राज्य शासनाने, मुख्यमंत्री यांनी घोषणा केली आहे, त्यांच्या मागण्यांबाबत १५ दिवसांनी आढावा घेतला जाईल. तीन महिन्यांचा टाईम बॉण्ड दिलाय, असं पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : क्लास रूमध्ये पोरींचा जोरजोरात वाद, पोराला राग अनावर, डेस्कवरुन उठला अन्...

Ajinkya Rahane: रेडी टू स्ट्राइक...! अजिंक्य रहाणेने टीम इंडियाला खिजवलं; खेळाडू फ्लॉप ठरताच केली 'अशी' पोस्ट

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

SCROLL FOR NEXT