MSRTC Bus, Aundh, Students,  Saam tv
महाराष्ट्र

Satara : रात्रीच्या सुमारास सावित्रीच्या लेकींनी आंदाेलनाचे हत्यार उपसले अन् अधिका-यांचे डाेळे उघडले; घटना वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, एसटी महामंडळ Shame Shame...

आंदाेलक विद्यार्थ्यांची एसटीच्या अधिका-यांनी माफी मागत त्यांना बस उपलब्ध करुन दिली.

ओंकार कदम

Satara News : सातारा जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाची सेवा विस्कळीत झाल्याचे पुन्हा एकदा समाेर आले आहे. क-हाड तालुक्यानंतर आता खटाव तालुक्यातील विद्यार्थी नियमीत बस सेवेसाठी आक्रमक झाले आहेत. औंध येथील शाळेतील मुलींनी रात्री नऊच्या सुमारास बस स्थानकाच्या दारात बसून धरणे आंदाेलन छेडले. (Maharashtra News)

औंध येथील शाळा सुटल्यानंतर दररोज मुले आणि मुली एसटी महामंडळाच्या बसने आपल्या आपल्या गावी जातात. साेमवारी सायंकाळी ५ पासुन रात्री ९ पर्यंत विद्यार्थ्यांना बस उपलब्ध हाेऊ शकली नाही. त्यामुळे चार तास विद्यार्थ्यांना बसची प्रतिक्षेत थांबावे लागले.

दूसरीकडे विद्यार्थ्यांचे पालक देखील चिंतेत पडले. चार तास थांबूनही बस न आल्याने छाेट्या छाेट्या विद्यार्थ्यांनी आंदाेलनाचा पवित्रा घेतला. सर्वांनी मिळून रात्री 9 च्या सुमारास बस स्थानकाच्या दारात ठिय्या मांडला.

लहान लहान पाेरं रस्त्यावर बसल्य़ाने बस स्थानकात एकच गाेंधळ उडाला. अखेरीस एसटी महामंडळाचे काही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलांची क्षमा मागत उद्यापासून (मंगळवार) विद्यार्थ्यांची गैरसोय हाेणार नाही अशी हमी देत आंदाेलक विद्यार्थ्यांसाठी बस उपलब्ध करुन दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Children Day Meaning: 14 नोव्हेंबरला बालदिन का साजरा करतात?

नवरा लटकलेला, तर पत्नी अन् ३ मुलांचे मृतदेह खाटेवर; हृदयाचा थरकाप उडवणारी घटना

Children's Day Special: बालदिनानिमित्त तुमच्या मुलांसोबत आज पाहा हे खास चित्रपट

Bihar Election Result Live Updates: दिग्विजय सिंह यांनी सांगितले काँग्रेसच्या पिछाडीचे कारण

IND vs SA VIDEO: लेगमध्ये त्याचा कॅच मिळतो...! टेम्बा बवुमासाठी पंतने आपल्या स्टाईलने लावली फिल्डींग; पुढच्याच बॉलला गेली विकेट

SCROLL FOR NEXT