विद्यार्थ्याचा अजब प्रताप,शिक्षिकांचे अश्लील फोटो काढून केले व्हायरल Saam Tv
महाराष्ट्र

विद्यार्थ्याचा अजब प्रताप,शिक्षिकांचे अश्लील फोटो काढून केले व्हायरल

अश्या घटना फक्त अहमदनगर जिल्ह्यातच नाही सर्वत्र घडत आहेत.

सचिन आगरवाल

अहमदनगर - कोरोनाकाळात Corona विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट फोन Smart Phone हा संपर्क आणि शिक्षणासाठी प्रभावी माध्यम ठरत असला, तरी याचे अनेक दुष्परिणाम समोर आले आहेत. अल्पवयीन विद्यार्थ्यांनी याच फोनच्या सहाय्याने शिक्षिकांचे अश्लील फोटो तयार करून ते व्हायरल करण्यासह त्यांचा मोबाइल क्रमांक पॉर्न साइटवर टाकणे, असे धक्कादायक गुन्हे केल्याचे पोलीस Police तपासात समोर आले आहेत.

हे देखील पहा -

अहमदनगर जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षिकेच्या फोटोंचे मॉफिंग करून, त्याचे अश्लील फोटोंमध्ये रूपांतर करून ते इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आले. तसेच त्या शिक्षिकेला वारंवार व्हिडीओ कॉल करून अश्लील कृत्य केले जात होते. दुसऱ्या शाळेतील एका शिक्षिकेचा मोबाइल क्रमांक पॉर्न साइटवर अपलोड करण्यात आला होता. एका विद्यार्थ्या कडून फोटो आणि मोबाइल क्रमांक गे साइटवर अपलोड करण्यात आला. पीडित व्यक्तींनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्यानंतर, तपासात हे गुन्हे करणारे अल्पवयीन विद्यार्थी असल्याचे समोर आले.

अश्या घटना फक्त अहमदनगर जिल्ह्यातच नाही सर्वत्र घडत आहेत. लहान मुलांची संख्या सायबर क्राईम मध्ये वाढत आहे. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मुलांच्या हातात दिवसभर मोबाईल आहे. त्यामुळे शिक्षणा बरोबरच मुलांचा सोशल मीडिया कडे कल वाढला आहे. असे असले तरी पालकांनी आपला पाल्य शिक्षण घेता घेता इंटरनेटचा वापर आणखीन कुठल्या गोष्टीसाठी करत आहे. त्यात तो काय करतो आहे. हे पाहणे महत्त्वाचे आहे. पालकांनी लक्ष ठेवल्याने मुलाना आपण चुकीचे काही करत नाही ना असा धाक बसेल.

आजचे युग हे आधुनिक युग समजले जात. मोबाईल आणि इंटरनेट आता जीवनाचा एक भाग झाला आहे. याचा वापर चांगल्या गोष्टींसाठी जसा केला जातो तसा त्यातून काही वाईट गोष्टी देख घडत असतात. विशेष म्हणजे मोठ्या माणसांना या सोशल मीडियातील जेवढी माहिती नसते तेवढी लहान वयात आत्ताच्या पिढीला आहे. परंतु हीच लहान बालक चुकुन आपण या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हा करत आहोत हे लक्षात येतं नाही. तेव्हा पालकांनो आपल्या पाल्यांना या सायबर गुन्ह्यात अडकण्यापासून वाचऊ शकता. कारण सायबर क्राईम मध्ये आता अल्पवयीन मुलांचा वाढता आलेख ही विचारकरायला लावणारी बाब आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT