लातूर - जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने लातूर Latur येथे दाखल झालेल्या पालकमंत्री अमित देशमुख Amit Deshmukh यांनी प्रारंभी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतल्यानंतर सायंकाळी लातूर तालुक्यातील टाकळी येथे जाऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून करण्यात येत असलेल्या बचाव व मदत मोहिमेची माहिती घेतली.
मांजरा नदीच्या Manjara Riverपाणी पातळीत वाढ झाल्याने टाकळी येथील काही शेतकरी Farmer शेतवस्तीवरच अडकले आहेत. त्यांच्या चोहोबाजूंनी पाण्याने वेढा दिल्यामुळे त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाच्या वतीने मोहिम राबविण्यात येत आहे. सांयकाळी अंधार असतानाही मोठी जोखीम पत्करुन हे पथक कार्यवाही करत होते.
हे देखील पहा -
या पथकाला प्रोत्साहन देण्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीशैल उटगे, जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज, मुख्य कार्यकारी अधिकारी,अभिनव गोयल इतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांसह सांयकाळी टाकळी येथे पोहचले. पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यांशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून त्यांना धीर दिला. काळजी करु नका, आपल्या मदतीसाठी बचाव पथक येत असल्याचे सांगितले.
पथकातील सदस्यांना वैयक्तिकरित्या भेटून पालकमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. मांजरा नदीचे पाणी टाकळी गावातील काही वस्त्यापर्यंत पोहचले आहे. त्या ठिकाणी जाऊन पालकमंत्री देशमुख यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. तहसीलदार स्वप्नील पवार यांना त्या ठिकाणी थांबण्यास सांगुन मदत कार्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.