नाशिक : नाशिक (nashik) येथील राम सेतू पूलाचे (ram setu bridge) स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. या अहवालात हा पूल (bridge) धाेकादायक झाला आहे असा निष्कर्ष आल्यास राम सेतू पाडावा लागेल असे मत महापालिका आयुक्त्यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. दरम्यान हा पूल पाडण्यास नाशिककरांचा (citizens) यापुर्वीपासून विराेध असल्याने राम सेतू पूलाचे भवितव्य स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालावर अवलंबून राहणार आहे. (ram setu bridge latest news)
गाेदावरीच्या पूराच्या पाण्यामुळे राम सेतू पूलास काही दिवसांपुर्वी तडा गेला. या पूलावरील काही ठिकाणी भगदाड देखील पडलं आहे. नाशिक महापालिकेने काही ठिकाणी डागडूजी केली परंतु पाण्याच्या प्रवाहामुळे डागडूजी केलेला भाग देखील पुन्हा खराब झाला. त्यामुळे या पूलावरील वाहतुक पुर्णत: बंद करण्यात आली आहे.
राम सेतू पूलाबाबत महापालिका आयुक्त म्हणाले पाेलिस त्यांच्या बाजूने विचार करते. तर महापालिका त्यांच्या बाजूने विचार करीत असते. स्ट्रक्चरल ऑडिट अहवालात जर हा पूल ताेडणे गरजे आहे असे म्हटलं तर ते करावं लागेल. जर तसं नाही केलं आणि भविष्यात या पूलाबाबत एखादी माेठी दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार काेण असा प्रतिप्रश्न आयुक्तांनी केला आहे. स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने या ठिकाणी अन्य पूल बांधावा लागेल की काय याबाबत संबंधित समिती निर्णय घेईल. तसेच पाटबंधारे विभाग आणि अन्य त्यासंदर्भातले विभाग प्रशासनास अहवाल देतील. सध्या तरी स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालावर सारं काही अवलंबून असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.