Dhananjay Munde Saam Tv News
महाराष्ट्र

दोषी कुणीही असो त्यावर कठोर कारवाई करणार - धनंजय मुंडे

वाळू माफियांच्या वाळू उपश्याने घेतला चार मुलांचा बळी; खेळण्यासाठी गेल्या चार मुलांचा वाळूसाठी केलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

विनोद जिरे

बीड - गेवराई तालुक्यातील शहाजानपूर चकला येथील दुर्दैवी घटनेत कोणी दोषी असेल, तर त्यावर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिला आहे. याविषयी धनंजय मुंडे म्हणाले आहेत, की गेवराई तालुक्यातील शहजानपूर चकला येथे नदीपात्रातील खड्ड्यात बुडून 4 शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे दुःखद वृत्त समजते आहे.

जिल्हा प्रशासनास अधिक तपास व चौकशी तातडीने करण्याच्या सूचना दिल्या असून अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. या प्रकरणाची अधिक माहिती घेत असुन, शासकीय मदतीबरोबरच या घटनेला मानवी चुका कारणीभूत असतील तर, दोषी कुणीही असो, त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. मृतांच्या कुटुंबियांच्या प्रति मी सहसंवेदना व्यक्त करतो. असं पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकातून म्हटलं आहे.

हे देखील पहा -

काय आहे संपूर्ण प्रकरण?

वाळू माफियांच्या वाळू उपश्याने चार चिमुकल्या मुलांचा बळी घेतला आहे. खेळण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा वाळू उपसा केलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या शहाजनपुर चकला या गावातील सिंदफणा नदी पात्रात, सातच्या दरम्यान घडली असून रात्री साडे आठ ते नऊच्या दरम्यान उघडकीस आली आहे.बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर अशी मृत मुलांची नावे असून ही सर्व मुले 9 ते 13 वयोगटातील आहेत.

दरम्यान या घटनेने मोठी खळबळ उडाली असून सध्या सिंदफना नदी पात्रात शेकडो नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. घटनास्थळी नागरिक आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी येऊन वाळू माफियांविरोधात ठोस कारवाई करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळं घटनास्थळी मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

SCROLL FOR NEXT