Nagpur: भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके; ४ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू...(पहा व्हिडिओ) Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur: भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके; ४ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू...(पहा व्हिडिओ)

नागपूरात एका हृदयविदारक घटनेत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये एका ४ वर्षांच्या चिमुरडीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर: नागपूरात एका हृदयविदारक घटनेत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये एका ४ वर्षांच्या चिमुरडीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने गावात (village) मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील बुटीबोरी जवळ भारकस (Bharkas) येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषदेविरोधात संताप पसरला आहे.

पहा व्हिडिओ-

५ दिवसांपूर्वी ४ वर्षांची अंजली दुपारी घराजवळ खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला (Attack) केला होता. या हल्ल्यामुळे चिमुरडी खाली पडली आणि जोरजोरात किंचाळू लागली. तोपर्यंत कुत्र्यांनी तिच्या कमरेचे, पाठिचे आणि पायाचे लचके तोडले होते. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाल्याने सुरुवातीला गावाजवळच्या टाकळघाट (Takalghat) प्राथमिक आरोग्य केंद्रात (Health Center) आणि नंतर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले होते.

मात्र, उपचारादरम्यान चिमुरडीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या परिसरात भटके कुत्रे आणि डुकरांची दहशत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच गावातील मुलांवर आणि लोकांवर कुत्र्यांनी अनेकवेळा हल्ले देखील केले आहेत. ग्रामपंचायत, पोलीस (Police), जिल्हा परिषदेकडे तक्रारी करुन देखील लक्ष देत नसल्यामुळे गावकरी संतापले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT