Devendra Fadnavis SAAM TV
महाराष्ट्र

BJP Leader On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस महिलांवर फिदा झालेत; माजी सहकार मंत्र्यांच्या अजब वक्तव्याने खळबळ

Devendra Fadnavis News : माजी सहकार मंत्र्यांच्या अजब वक्तव्याने चर्चेला उधाण

विश्वभूषण लिमये

Solapur Political News : सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 26 मधील कल्याण नगर येथील रस्ते विकास कामाचे उद्घाटन भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी वादग्रस्त विधान केले आहे. (Latest Marathi News)

राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडताना महिलांचा मोठ्या प्रमाणात विचार केला आहे. मुलीच्या जन्मापासून ते तिच्या लग्नापर्यंत काळजी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यंदा महिलांवर फिदा आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला ,त्यामध्ये सर्वात जास्त महिलांवर लक्ष केंद्रित केलं आहे.

मुलगी जन्माला आल्यावर तिचे स्वागत केले. मुलगी शिकायला गेल्यावर त्याला सुद्धा पैसे द्यायचं ठरवलं. परत पाचवी सहावीला गेल्यावर 5 ते 6 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील. दहावीचे शिक्षण झाल्यावर मुलगी 18 वर्षानंतर तिला 15 किंवा 18 हजार रुपये मिळतील. (Solapur News)

मुलींची चिंता देवेंद्र फडणवीस करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यंदा महिलांवर प्रचंड फिदा झालेत. महिलांच्या बचत गटासाठी देखील त्यांनी मुंबईत मॉल सुरू केलं. महिलांच्या बचत गटातील मालाला मुंबईत मार्केट मिळाव म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले आहे असं ही यावेळी सुभाष देशमुख म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugarcane Juice Benefits: फक्त १० रूपयाच्या रसामुळे किडनी, लिव्हर होईल एकदम स्वच्छ

Maharashtra News Live Update: शरद पवार यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले

SIP Investment : १० हजारांच्या गुंतवणुकीतून १ कोटींचा फंड; पाहा संपूर्ण गणित

Firing Case: अमेरिकेतील हॅलोविनच्या उत्सवाला हिंसाचाराचं गालबोट; गोळीबारात ६ जणांचा मृत्यू १५ जण जखमी

Director Injured: मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी; प्रसिद्ध दिग्दर्शकाला लागली गोळी, रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT