Rajesh Tope Saam Tv
महाराष्ट्र

"आरोग्यमंत्री साहेब परीक्षांचा खेळ बंद करा, नाही तर हातात बंदुका घेऊ!"

आरोग्य मंत्री साहेब, शेतकऱ्यांच्या पोरांनी नोकरीला लागू नये असं वाटत असलं तर तसं सांगा; पण हा परीक्षेचा सुरु असलेला खेळ बंद करा अन्यथा आम्ही हातात बंदुका घेऊ, विद्यार्थ्यांनी मांडल्या संतप्त भावना.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ काहीही केल्या सरता सरेनासा झालाय. लातूर जिल्ह्यात आज आरोग्य विभागाच्या परीक्षा पार पडल्या. सकाळी १० वाजताची वेळ असतानाही अर्धा तास उशिरानं विध्यार्थ्यांना पेपर देण्यात आला, मात्र त्यातही गल्लत झालीच. ज्या जागेसाठी ज्या विषयाचा पेपर हातात येणं अपेक्षित होतं तसं न होता भलताच पेपर हातात देण्यात आला. त्यानंतर परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यानी गोंधळ घातल्यानंतर पुन्हा चुकीची दुरुस्ती म्हणून दुसरा पेपर देण्यात आला, मात्र तोही सीलबंद नव्हता.

हे देखील पहा :

हिंगोली, परभणी अश्या विविध जिल्ह्यातून परीक्षा देण्यासाठी विध्यार्थी आले होते. मात्र, आता त्यांचा या परीक्षेवर विश्वासच राहिला नसल्यानं विध्यार्थ्यानी संतप्त भावना व्यक्त केल्यात. वसमत येथून परीक्षेला आलेला गजानन पडुळे यांना लातुर येथील परीक्षा केंद्र आले होते. हॉल क्रमांक 12 या वर्गात नंबर आला अर्धा तास पेपर उशिराने तो पण दुसरा देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या हॉलमधील पेपर आणून दिला गेला सीलबंद पेपर फोडताना परिक्षार्थ्याच्या सह्या घेणे बंधनकारक असताना घेतले नाहीत.

या गलथान कारभारामुळे परीक्षार्थ्यांनी गोंधळ केला असता केंद्राचालकांनी केस दाखल करण्याची धमकी दिली. चार पोलिसांनी चोरासारखं वागवले, माफीनामा जबरदस्तीने लिहून घेतला. यावर संतप्त झालेले गजानन पडुळे यांनी थेट आरोग्यमंत्री राजेश टोपें यांना सवाल केला आहे की शेतकऱ्यांच्या पोराला नोकऱ्या लागू नये असं वाटत असलं तर तसं पत्रकार परिषद घेऊन सांगा पण आम्हाला तिकिटासाठी पैसे खर्च करायला लावू नका. हा परीक्षेत सुरु असलेला खेळ बंद करा. आम्ही हातात बंदुका घेऊ अशी संतप्त भावना परीक्षार्थी गजानन पडुळे यांनी मांडल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT