Mumbai- Chennai Express Saam Tv
महाराष्ट्र

Chennai Express: सोलापूरात चेन्नई एक्स्प्रेसवर दगडफेक, ट्रेनच्या काचा फुटल्या; प्रवासी जखमी

Mumbai- Chennai Express: मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना ताजी असतानाच आता चेन्नई एक्स्प्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केली. पारेवाडी - वाशिंबे दरम्यान ही घटना घडली.

Priya More

सोलापूरमध्ये चेन्नई एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. धावत्या रेल्वेववर दगडफेक करण्याची ही १० दिवसांतली दुसरी घटना आहे. मुंबई - चेन्नई एक्स्प्रेसवर पारेवाडी - वाशिंबे दरम्यान दगडफेक करण्यात आली. मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तींकडून पुन्हा मुंबई - चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे.

अवघ्या १० दिवसांत रेल्वेवर दगडफेक करण्यात आल्याची ही दुसरी घटना घडल्यामुळे आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दगडफेकीत विकलांग डब्यात बसलेल्या एक प्रवासी किरकोळ जखमी झाला असून त्याला तात्काळ प्रथमोपचार देण्यात आले आहेत.

अनिकेत लहामुने असं जखमी व्यक्तीचं नाव असून तो पुणे ते कुर्डूवाडी असा प्रवास करत होता. या दगडफेकीमध्ये मोठी हानी झालेली नसली तरी रेल्वेच्या काचा फुटल्या असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सोलापूर लोहमार्ग पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : चपलेने मारलं, फावड्याने हल्ला केला; तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला चोपलं,Video व्हायरल

पुणे-सोलापूर महामार्गावर भयंकर अपघात, क्रूझरची ट्रकला जोरात धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला सोनं खरेदी का करतात? आयुष्यात होतो 'हा' मोठा बदल

March End: मार्च संपण्याआधी ही कागदपत्रे जमा कराच, अन्यथा पगारातून होतील पैसे कट; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : नाशिक शहरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार;7 जणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT