माजी आमदार वीरेंद्र जगताप Saam TV
महाराष्ट्र

प्रहारच्या कार्यकर्त्यांची माजी आमदाराच्या घरावार दगडफेक; पाहा Video

पुतळा सुध्दा घराबाहेर जाळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. १० ते १२ कार्यकर्ते अटकेत आहे.

अरुण जोशी

अमरावती: चांदूर रेल्वे शहरात १० ते १२ राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या समर्थकांनी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर आज गुरूवारी सकाळी हल्लाबोल केला. विविध घोषणाबाजी करून दगडफेक केली. तसेच पुतळा सुध्दा घराबाहेर जाळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. १० ते १२ कार्यकर्ते अटकेत आहे. सोमवारी अमरावती जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पार पडली असून त्याचा निकाल ५ ऑक्टोंबर रोजी घोषीत झाला. त्या विजयाचे जल्लोष माजी आमदार वीरेंद्र जगताप, बबलू देशमुख, पालकमंत्री यशोमती ठाकूर हे जबाबदार लोक त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत साजरा करीत होते.

तेव्हा वीरेंद्र जगताप यांनी जोरजोरात घोषणाबाजी करीत असतांना राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या आई वर अश्लील घोषणाबाजी केली. यामुळे बच्चू कडू समर्थकांत प्रचंड नाराजी होती. अशातच आज गुरूवारी सकाळी वीरेंद्र जगताप यांच्या घरावर बच्चू कडू समर्थक पोहचले होते. यावेळी पोलीस स्टेशनवर काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असुन वीरेंद्र जगताप यांच्या घरासमोर सुध्दा बंदोबस्त आहे. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक शिशीकांत सातव चांदूर रेल्वेत पोहचले होते. तक्रार देण्याची प्रक्रीया सुरू आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi School : आपुल्या घरात हाल सोसते...! मुंबईतील आणखी एक मराठी शाळा बंद होणार

Akola : अकोल्यातील जवान नितेश घाटे यांना अयोध्येत वीरमरण; कर्तव्यावर असताना दुर्दैवी घडलं

Pune Rave Party: नवऱ्याला वाचवण्यासाठी रोहिणी खडसेंनी अंगावर चढवला वकिलीचा कोट, कोर्टात नमकं काय घडलं?

Hair Style: श्रावणात सणासुदींना साडीवर करा 'या' सुंदर बन हेअरस्टाइल्स

Maharashtra Live News Update: पहलगाममध्ये क्रूर दहशतवादी हल्ला: राहुल गांधी

SCROLL FOR NEXT