लक्ष्मण सोळुंके
जालना : कोरोनामध्ये राज्य सरकारने भ्रष्टाचार केला असा आरोप राज्य सरकारवर करणाऱ्यांना पोटात पोटदुखी आणि मळमळ आहे. वास्तविक पाहता राज्य सरकारने (State Government) कोरोना काळात रुग्णांवर चांगले उपचार करून रुग्णांना मृत्यूपासून वाचवलं. पण काही जणांना राज्य सरकारचं कौतुक परवडत नाही. त्यामुळे त्यांना पोटदुखी आणि मळमळ होत असून त्यांच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही. जे आरोप करतात त्यांनी राज्य सरकारचा भ्रष्टाचार (Corruption) बाहेर काढावा आणि स्वतःचा आरोग्य केंद्रात सरकारी दराने ईलाज करून घ्यावा किंवा फुकट करुन देऊ असं सांगत त्यांचा ईलाज करणं हे सरकारचं कर्तव्य आहे असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कुणाचंही नाव न घेता लगावला आहे.
जालन्यातील (Jalna) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नुतन वास्तूचा उदघाटन आणि लोकार्पण सोहळा आज पार पडला.राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.
हे देखील पहा-
थपडा देणं आणि थपडा खाणं हे आमचं आयुष्य;
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते या ईमारतीचं उदघाटन आणि लोकार्पण सोहळा पार पडला.यावेळी मुख्यमंत्र्यांनी टोलेबाजी करत विरोधकांचा समाचार घेतला. या कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच उपस्थितांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचं कौतुक केलं. कुणी माझं कौतुक केलं की मला धडधड होते असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सलमान खानच्या (Salman Khan) दबंग चित्रपटातला सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) यांचा थप्पड से डर नही लगता साहब प्यार से डर लगता है हा डायलॉग देखील आठवला. पण हे कौतुक वेगळं असून थपडा देणं आणि थपडा खाणं हे आमचं आयुष्य असल्याचं सांगत कुणी माझं कौतुक केलं की मला धडधड होते असं सांगायला देखील मुख्यमंत्री विसरले नाही. (CM Uddhav Thackeray)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.