बाब्बो! उदबत्तीच्या एका काडीची किंमत तब्बल 25 हजार रुपये दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

बाब्बो! उदबत्तीच्या एका काडीची किंमत तब्बल 25 हजार रुपये

लातुरात अवतरली महागडी अगरबत्तीची काडी

दीपक क्षीरसागर

लातूर - लहानपणी लागलेल्या छंदातून 12 शिक्षित तरुणाने अनोखा व्यवसाय सुरू केला अन तब्बल 25 हजाराला एक काडी असलेली अगरबत्ती आता विक्री करत आहेत. सध्या या अनोख्या 25 हजार रुपये किमतीच्या अगरबत्तीच्या काडीची मोठी चर्चा जिल्हाभर सुरू आहे. लातूरच्या किरण भारत तिवारी या तरुणाने आतापर्यंत 35 लाखांची उलाढाल करत चांगला नफा कमवला आहे.

हे देखील पहा -

किरण भारत तिवारी अस नाव असलेल्या तरुणाचे शिक्षण अवघे 12 वी पर्यंत झाले आहेत. त्याचे वडील भारत तिवारी हे लातूरच्या महानगरपालिका मध्ये नोकरी करतात 2014 मध्ये वडील सेवानिवृत्त झाले. किरणला लहानपणापासून अगरबत्तीची मोठी आवड होती. 2012 मध्ये होलसेल अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय सुरू केला जिथं रामकथा, भागवत कथा असतील तिथं स्टॉल लावून अगरबत्तीची विक्री करत असे सन 2019 मध्ये किरणने लातुरात बसस्थानकाच्या पाठीमागे भारत सुगंधालय या नावाने दुकान थाटले.

त्याच्याकडे जास्तीच्या मागणी असलेल्या फ्लोरिश फ्रेग्रंस, श्रीकृष्ण परणामी, गुरू आचार्य आणि राजपाल या अगरबत्तीची मोठी मागणी असते त्याच्याकडे तब्बल 25 हजार रुपयांची एक काडी असलेली अगरबत्ती आहे. याची जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू आहे.

किरण सोशल मीडियावर माहिती घेऊन अगरबत्ती मागवतात कर्नाटक, गुजरात, ओडिशा आणि तामिळनाडू या राज्यातून खरेदी करतात. सुरुवातीला 2 लाख 60 हजार रुपयांने या व्यवसायाची सुरुवात केली आजतागायत त्यांनी किमान 35 लाखाची मोठी उलाढाल केली आहे. किरण सध्याला लातुर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात अगरबत्तीचा पुरवठा करत आहेत. नव्या तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा शाश्वत व्यवसाय सुरू केला तर चांगली कमाई असल्याचे किरण सांगतात.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

SCROLL FOR NEXT