Sangli News Saam Tv
महाराष्ट्र

Sangli News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पेटला; आंदोलकांची पोलिसांसोबत झटापट

सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला आहे.

विजय पाटील

Sangli News - सांगलीतील आष्टा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद आता पुन्हा पेटला आहे. सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला आहे. यावेळी परिसरामध्ये 144 कलम लागू करण्यात आलं होतं. संपूर्ण परिसरातील लाईट घालवण्यात आली होती.

शिवप्रेमींनी गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाआरती करण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. हा पुतळा रात्री हटवण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे शिवप्रेमींनी आष्टा मधील सांगली- इस्लामपूर रस्त्यावर ठिय्या मारला. आंदोलकांनी रास्ता रोको सुरू केला. पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली. पोलिसांनी रस्ता रोको करत असलेल्या आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

भाजपचे नेते निशिकांत पाटील यांच्यासह शिवप्रेमींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी पहाटे शिवप्रेमींनी गनिमी काव्याने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे, त्यानंतर पुतळ्याचा मुद्दा चिघळला आहे. रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पारंपारिक चव आणि आरोग्याचा खजिना असलेली लाल माठाची भाजी तुम्ही कधी खाल्लीये का? गावरान स्टाईल सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: अकोल्यात टॉवर चौकात वंचित कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको आंदोलन

Heartburn Remedies: छातीत जळजळ झाल्यास हे 3 उपाय करताय तर आताच सावध व्हा; नाहीतर त्रास अजून वाढेल

Famous Actor Divorce : २० वर्षांच्या संसारानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट? अखेर त्याने सोडले मौन, म्हणाला...

Bribe Case : धक्कादायक! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा सापडला जाळ्यात

SCROLL FOR NEXT