नंदुरबार: काँक्रिटीकरण अपूर्ण, उघड्या गटारांमुळं आरोग्य धोक्यात; पिंप्राणी गावची दुर्दैवी कहाणी
नंदुरबार: काँक्रिटीकरण अपूर्ण, उघड्या गटारांमुळं आरोग्य धोक्यात; पिंप्राणी गावची दुर्दैवी कहाणी दिनू गावित
महाराष्ट्र

नंदुरबार: काँक्रिटीकरण अपूर्ण, उघड्या गटारांमुळं आरोग्य धोक्यात; पिंप्राणी गावची दुर्दैवी कहाणी

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

शहादा : शहादा तालुक्यातील (Shahada Taluka) पिंप्राणी गावात अनेक समस्या असल्याने नागरिकांना अडचणी निर्माण होत आहे. गावातून स्मशानभूमी कडे जाण्यासाठी रस्ता तयार केला, परंतु नाल्यावर पूल नसल्याने नागरिकांना अंत्यविधीसाठी अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाने फरशी पूल तयार करावे, गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय नसल्यामुळे नवीन इमारतीची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

तसेच गावातील गल्लीतून जाणारे रस्त्याचे काँक्रिटीकरण काम अपूर्ण अवस्थेत आहे ते पूर्ण करावे, गावांतर्गत गावांमध्ये उघड्या गटारी असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याने गटारीचे काम करावे, तसेच गावातील ग्रामपंचायतीच्या बोरवेलचा खाजगी कामासाठी वापर केला जात आहे त्यावर निर्बंध लावावे अशा विविध मागण्यांसाठी गावकऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना (Group Development Officer) निवेदन सादर करून आपल्या मागण्या सादर केल्या आहेत. यावर प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन कारवाई करावी. मागण्या मान्य न झाल्यास भारतीय ट्रायबल टायगर सेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नरेंद्र मोदींचा 15 मे रोजी मुंबईत रोड शो, वाहतूक मार्गात करण्यात आलाय बदल

Urmila Kothare: कडक दिसतेय अप्सरा; उर्मिला कोठारेचा घायाळ लूक!

Nandurbar Rain News | नंदुरबार शहरात अवकाळी पावसाचं थैमान, बोगद्यात साचलं पाणी

Viral Video: घोडा शर्यतीदरम्यान टांगा उलटला; घोडे रस्त्यावर घसरले, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद

Kitchen Tips: फ्रीजरमध्ये खूप सारा बर्फाचा साठा झालाय? हे घरगुती उपाय करा फॉलो

SCROLL FOR NEXT