चंद्रकांत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू नव्हेत; संजय राऊतांचे टीकास्त्र Saam TV
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू नव्हेत; संजय राऊतांचे टीकास्त्र

'राष्ट्रवादीसोबत आम्ही महाराष्ट्र आहोत, काँग्रेससोबत सुद्धा आहोत मात्र गोव्यात काँग्रेससोबत जागा वाटप झालं नाही त्यांची काही मजबुरी असेल आमची काही मजबुरी असेल'

जयश्री मोरे

मुंबई : चंद्रकांत पाटील हे काय महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू नाहीत, राज्याची चिंता करायला आमचं सरकार आहे आणि देशाची चिंता पंतप्रधानांनी करायला हवी. कारण तिकडे लडाखच्या सिमेवरती शत्रूचा धोका वाढत आहे असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्रात सध्या अनेक अडचणी आहेत, त्यामुळे राज्याला कार्यवाहू मुख्यमंत्र्याची गरज असल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. त्याच्या या वक्तव्यावरती राऊतांनी प्रतिक्रिया दिली. 'चंद्रकांत पाटील हे काय महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू नाहीत, राज्याची चिंता बघायला आमचं सरकार आहे असं म्हणत राऊत यांनी पाटील यांना टोला लगावला.

राऊत पुढं म्हणाले, 'राष्ट्रवादीसोबत आम्ही महाराष्ट्र आहोत, काँग्रेससोबत सुद्धा आहोत मात्र गोव्यात काँग्रेससोबत (Congress) जागा वाटप झालं नाही त्यांची काही मजबुरी असेल आमची काही मजबुरी असेल उमेदवारांची यादी तयार होतं आहे. आम्ही निवडणुका लढवू 18, 19 तारखेला आम्ही पुन्हा एकदा चाललोय तेव्हा उमेदवारांची यादी जाहीर करू अशी माहिती देखील राऊत (Sanjay Raut) यांनी दिली.

दरम्यान गोव्यातील (Goa) सामान्य लोकांना आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात उभं करु, गोव्याचे राजकारण हे प्रस्थापितांच्या हाती गेलेले आहे. यामध्ये लॅंड माफिया, भ्रष्टाचारी ड्रग्ज माफिया यांच्या हातात राजकारणाची सूत्रे आहेत. हे जर गोव्यात बदलायचे असेल तर आपल्यातल्या सर्वसामान्यांना गोव्यातील लोकांना निवडून आणायला हवं असंही ते यावेळी म्हणाले.

हे देखील पहा -

यावेळी राऊतांनी उत्तरप्रदेशच्या (UP) राजकारणावरती देखील भाष्य केलं, योगी जर गोरखपूरहुन निवडणूक लढवत असतील तर त्याबद्दल आम्हाला काही आपत्ती नाही. जागावाटपाबाबत उत्तर प्रदेशमध्ये आमचा विचार सुरूआहे. आम्ही पन्नासच्या जवळपास जागा लढवू तर गोव्यामध्ये 10 ते 15 च्या दरम्यान शिवसेना जागा लढवणार असल्याचंही राऊतांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT