नागपूर : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातमध्ये सध्या धुसफूस सुरु आहे. “या तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आहेत, समन्वय समिती आहे. त्यामुळे हे तिन्ही नेते बसून निर्णय घेतील, मात्र, सार्वजनिक कार्यक्रमात तलवार काढली म्हणून गुन्हे दाखल करणे योग्य नसल्यातचं म्हणत मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तसंच या प्रश्नावर तिन्ही पक्षांचे नेते बसून निर्णय घेत आहेत. गृहखातं (Home Department) बदलने हा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. ते ठरवतील” असं मत कॅबीन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. उद्यापासून महाराष्ट्र मोकळा श्वास घेतोय. गेले दोन वर्षे संकटात गेले, मोठ्या अडचणी आल्या, त्यातून बाहेर पडत असल्यासारखं वाटतंय. मात्र, कोरोना अजून गेला नाही, त्यामुळं काळजी घ्यावी, असं आवाहनही असंही वडेट्टीवार यांनी केलंय.
हे देखील पहा -
दरम्यान आज याच नाराजीच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Uddhav Thackeray and Dilip Walse Patil) या दोघांमध्ये वर्षा निवास्थानी बैठक सुरु आहे. भाजपच्या नेत्यांविरोधात पुरावे देऊनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने शिवसेना, राष्ट्रवादीत धुसफूस सुरू झाली आहे. राष्ट्रवादीकडे (NCP) असलेल्या गृहखात्याकडून भाजप नेत्यांवर कोणतीच कारवाई केली जात नसल्याचंही सेनेच्या अंतर्गत चर्चा असल्यानेच ही बैठक आयोजित केली आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.