Thane Crime News Saam Digital
महाराष्ट्र

Thane Crime News: अध्यक्षांसमोर स्वत: उपस्थित राहून उत्तर द्या ; ठाणे पोलिसांना महिला आयोगाचा आदेश, काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Thane Crime News: ठाणे येथील तरुणीवर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली आहे. ठाणे पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या कारवाईचा संपूर्ण अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षांसमक्ष उपस्थित राहून सादर करण्याचे आदेश आज राज्य महिला आयोगाने दिले आहेत.

Sandeep Gawade

Thane Crime News

ठाणे येथील तरुणीवर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली आहे. ठाणे पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या कारवाईचा संपूर्ण अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षांसमक्ष उपस्थित राहून सादर करण्याचे आदेश आज राज्य महिला आयोगाने दिले आहेत. ठाण्यात एका तरुणाने मित्रांच्या मदतीने तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

तरुणीवर झालेल्या या हल्ल्यानंतर दिनांक १४ डिसेंबर २०२३ रोजी पीडित तरुणीच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिच्यावरील हल्ल्याची घटना उघडकीस आली होती. सदर प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेत दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी ठाणे पोलिसांना याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. आयोगाच्या निर्देशानंतर ठाणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा नोंद करून आठ दिवस झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता पोलिसांनी गेल्या आठ दिवसात याप्रकरणी केलेल्या तपासाबाबत महिला आयोगासमोर व्यक्तिशः उपस्थित राहून अहवाल सादर करावा असे निर्देश आयोगाने दिले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कासारवडवली यांनी प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांसह वस्तुनिष्ठ अहवाल दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी दु. ३ वा. महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयात मांडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिला आयोगाला पोलीस काय उत्तर देणार याकडे लक्ष दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT