राज्यात निर्बंध नाही मात्र...! राजेश टोपेंचं नागरिकांना आवाहन
राज्यात निर्बंध नाही मात्र...! राजेश टोपेंचं नागरिकांना आवाहन Saam Tv
महाराष्ट्र

राज्यात निर्बंध नाही मात्र...! राजेश टोपेंचं नागरिकांना आवाहन

लक्ष्मण सोळुंके

जालना: राज्यात उद्या पासून सुरू होणाऱ्या गणपती उत्सावावर राज्यात कुठल्याही प्रकारचे निर्बध नाहीत. मात्र या दहा दिवसांच्या काळात कोविड अनुरूप असे जे नियम आहे ते पाळावे लागणार आहे. केरळमध्ये ज्या प्रमाणे उत्सवात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली होती. त्या प्रमाणत राज्यात कोरोनाची संख्या वाढू नाही म्हणून या काळात सर्व राजकीय सभा संमेलन कार्यक्रमावर मर्यादा घालण्यात येतील या बाबद मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून या भक्ती भावाच्या उत्सवात कोत्याही प्रकारचे विघ्न यावे नाही म्हणून नाहरिकांनी नियमांचे पालन करावे, या दहा दिवसांच्या काळात निर्बंध नसतील मात्र कोरोनाचे नियम मात्र पाळावे लागतील त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की भक्तिभावाने विघ्नहर्त्याचे पूजा करावी येणारे वर्ष हे निरविघ्न असावं या साठी नागरिकांनी गर्दी टाळावी असे आवाहन राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा एकदा डोकंवर काढायला लागली आहे. गणेशोत्सवानिमीत्त नागरिक खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहे. अनेक लोक कोरोनाचे नियम पाळताना दिसत नाहीत. सोशियल डिस्टंसिंगचा फज्जा सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरनाची तिसरी लाट लक्षात घेता ही धोक्याची घंटा असू शकते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kshitij Zarapkar : अभिनेते क्षितीज झारापकर यांचं कर्करोगाने निधन; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

ICC Champions Trophy: 'टीम इंडियाला पाकिस्तानात यावंच लागेल, अन्यथा...' माजी पाकिस्तानी खेळाडूची वॉर्निंग

Kalyan Crime News: तहान लागल्याने पाणी प्यायला गेली, नराधमानं संधी साधली; कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

India's Smallest Village: भारतातील सर्वात लहान गाव तुम्हाला माहिती आहे का?

Jayant Patil News : भाजपचे इंजिन बंद पडल्यामुळे मनसेचे इंजिन सोबत घेतले; जयंत पाटील यांची खोचक टीका

SCROLL FOR NEXT