Eknath shinde News  saam tv
महाराष्ट्र

State Government Decision: महिला व बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारचा मोठा निर्णय; नवी हेल्पलाईन सुरु होणार

मिशन शक्ती अंतर्गत 181 महिला हेल्पलाइन ही केंद्राच्या धर्तीवर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : राज्यातील संकटग्रस्त महिला व बालकांना तातडीने आवश्यक ती माहिती व सहाय्य मिळण्यासाठी राज्य सरकारकडून नव्या हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. मिशन शक्ती अंतर्गत 181 महिला हेल्पलाइन ही केंद्राच्या धर्तीवर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

संकटात सापडलेल्‍या महिलांना सहाय्यता मिळण्यासह गरजेनुसार कायदेशीर, मानसिक, सामाजिक आधार महिलांना हेल्‍पलाइनच्‍या माध्यमातून उपलब्‍ध होणार आहे. शासकीय योजनांची माहिती व समुपदेशन सुविधादेखील महिलांना टोल फ्री क्रमांकाच्‍या माध्यमातून मिळणार आहे. (Breaking Marathi News)

केंद्र शासनाच्‍या महिला व बाल विकास मंत्रालयाने दिलेल्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार मिशन शक्‍ती या एकछत्री योजनेतील महिलांची सुरक्षा व संरक्षण या उपाययोजनेंतर्गत ही हेल्‍पलाइन सुरू केली आहे. (Latest Marathi News)

महिला व बालविकास विभागाचे आयुक्‍त यांच्‍या स्‍तरावरून महिला हेल्‍पलाइन सुरू करण्यास शासन मान्‍यता दिलेली आहे. ही योजना पूर्णपणे केंद्र पुरस्‍कृत राहणार असल्‍याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Facts : सापांना कान नाहीत, मग ते आवाज कसे ऐकतात? ९९ टक्के लोकांना याबद्दल माहिती नाही

Kidney Health: किडनी खराब होऊ नये म्हणून जीवनशैलीत आजच करा हे 7 महत्त्वाचे बदल

पावसाळ्यात खा गावरान स्टाईल दिंड्याची भाजी; घरी बनवण्याची रेसिपी एकदम सोपी

Koel Mallick Resign : ३ महिन्यांपूर्वीच शपथ, आता राज्यसभा खासदारकीचा राजीनामा; माजी मुख्यमंत्र्यांना जोरदार झटका

crime : भूलतज्ज्ञाची अपार्टमेंटमध्येच निर्घृण हत्या, ८ वर्षांचा मुलगाही गंभीर जखमी; डॉक्टर पत्नीच्या कृत्याने खळबळ

SCROLL FOR NEXT