Pankaja Munde In Jalna To Laxman Hake: 
महाराष्ट्र

Pankaja Munde Video|ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही, सरकारनं सिद्ध करावं: पंकजा मुंडे

Pankaja Munde In Jalna To Laxman Hake: ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी जालन्यातील वडीगोद्री येथे प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसलेत. आज पंकजा मुंडे यांनी त्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतची विचारपूस केली.

Bharat Jadhav

मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाने आंदोलन तापणार असल्याची चिन्हे आहेत. जालन्यात सुरू असलेल्या ओबीसी समाजाच्या आंदोलनकर्त्यांची भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनीभेट घेतली. त्यांच्यासोबत धनजंय मुंडेदेखील उपस्थित होते. मराठा आरक्षण देताना ओबीसी सामजाच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही , सिद्ध करावं अशी मागणी पंकजा मुंडेंनी केलीय.

जालन्यातील वडीगोद्री येथे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी प्रा. हाके आणि नवनाथ वाघमार यांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून पंकजा मुंडेंनी त्यांची भेट घेतली. सकाळी सरकारच्या शिष्टमंडळाने ओबीसी समाजाच्या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती.

दरम्यान पंकजा मुंडेदेखील ओबीसी समाजाच्या मागणीसाठी आक्रमक झाल्यात. ओबीसी आंदोलनावरील राज्य सरकारच्या भूमिकेवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. ओबीसी आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. त्यानंतर आज संध्याकाळी त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली.

सरकारने ओबीसी समाजाचा आवाज ऐकला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, मराठा आरक्षणाचा ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे समजून सांगा ,अशी मागणी पंकजा मुंडे यांनी यावेळी केली. पंकजा मुंडे यांनीही मागणी करताच ओबीसी समाजाच्या कारकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दरम्यान आज सकाळी सरकारच्या शिष्टमंडळाने देखील आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. उद्या सकाळी हाके यांचे शिष्टमंडळ सरकारच्या शिष्टमंडळाची भेट घेत आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडणार आहेत.

राज्याचे शासन आणि महाराष्ट्रातील सर्वच नेते म्हणताय की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही तर कसा लागत नाही याचं आम्हाला राज्य शासनाकडून लेखी प्रमाणपत्र पाहिजे. , अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी सरकारकच्या शिष्टमंडळाकडे केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT