गोपीचंद पडळकरांना राज्य सरकारने संरक्षण द्यावे - देवेंद्र फडणवीसांची मागणी
गोपीचंद पडळकरांना राज्य सरकारने संरक्षण द्यावे - देवेंद्र फडणवीसांची मागणी Saam Tv
महाराष्ट्र

गोपीचंद पडळकरांना राज्य सरकारने संरक्षण द्यावे - देवेंद्र फडणवीसांची मागणी

भारत नागणे

पंढरपूर: "गोपीचंद पडळकरांच्या केसाला जरी धक्का लागला तरी, आम्ही गप्प बसणार नाही" असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे. आमदार गोपीचंद पडळकर हे राज्य सरकारच्या घोटाळ्याबाबत आवाज उठवत आहेत. राज्य सरकारने तात्काळ आमदार पडळकर यांना संरक्षण द्यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपुरात केली. (State government should protect Gopichand Padalkar - Devendra Fadnavis demands)

हे देखील पहा -

आमदार गोपीचंद पडळकर व त्यांच्या समर्थकांवर काल सांगलीतील आटपाडी तालुक्यात हल्ला झाला होता. या हल्ल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी निषेध करत राज्य सरकारने ही जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी केली. लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे परंतु राज्य सरकार भाजपा कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणीही विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मस्ती केली, चांगलीच जिरली! भररस्त्यात तरुण खुर्ची टाकून बसला; पुढं जे घडलं ते... धक्कादायक VIDEO

शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात डायलिसिस सुविधा मिळणार मोफत, साई भक्ताकडून 24 लाखाच्या मशीनची देणगी

Today's Marathi News Live : नरेंद्र मोदींची पुण्यात सभा, अमित ठाकरे सभेसाठी रवाना

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का; मालोजीराजे छत्रपतींना विश्वास, Video

SCROLL FOR NEXT