Rajesh tope news SaamTv
महाराष्ट्र

तिसऱ्या लाटेस प्रतिबंध करण्यास राज्य सरकार सक्षम - टोपे

राज्यातील ७१ हजार आशा स्वयंसेविकांना १५०० रुपये व ३ हजार ६०० गटप्रवर्तकांना १७०० रुपये वाढ देण्यात येणार आहे. यासाठी दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्याला आज मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तिसऱ्या लाटेच्या संदर्भात आज मंत्रीमंडळात चर्चा झाली, केरळच्या पार्श्वभूमीवर जिथे ओणम साजरा झाला तिथे मोठी गर्दी झाली त्याचा हा परिणाम असून मी स्वतः केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी बोललो आहे. ३१ हजार केसेस एका दिवशी आल्यात त्याची कारणं काय? आणि केरळपासून तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली असे समजायचे का? या प्रश्नावर त्यांनी ओणम सणामुळे आणि चाचण्यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे हि संख्या वाढली आहे. असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे. जून महिन्यात केंद्र शासनाने सांगितले की जून महिन्यात तिसरी लाट येऊ शकेल व ६० लाख लोक बाधित होऊ शकतील, आणि त्याच्या टक्केवारीत १२ टक्के ऑक्सिजन लागेल, मात्र दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता ही जी आकडेवारी आहे त्याला धरून तयारी करत असल्याचे टोपे म्हणाले.

हे देखील पहा -

राज्यात ऑक्सिजन उपलब्धतता पूर्वी १२०० ते १३०० मेट्रिक टन होती. आता २००० मेट्रिक टन पर्यंत क्षमता वाढवण्यात आली आहे. राज्यात एक हजार रुग्णवाहिका खरेदी केल्या, ५०० रुग्णवाहिका सेवेसाठी दाखल झाल्या आहेत तर उर्वरित ५०० रुग्णवाहिका सप्टेंबर अखेर प्रत्येक आरोग्य केंद्रांपर्यंत जाणार असून महाराष्ट्रात १०० टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रे, रुग्णालये, जिल्हा रुग्णालयांना रुग्णवाहिका मिळणार असल्याचा विश्वास देखील टोपेंनी व्यक्त केला.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख बाधित झाले आणि तिसऱ्या लाटेत ६० लाख लोक बाधित होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात १२ टक्के लोकांना ऑक्सिजन लागतो. दुसऱ्या लाटेत एकाच वेळी साडेसहा लाख ॲक्टिव्ह रुग्ण होते. आता १३ लाख ॲक्टिव्ह रुग्ण असतील, असा अंदाज व्यक्त होत असून हि अंदाजित आकडेवारी आहे. त्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व तयारी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. म्हणूनच ‘सिरो सर्व्हेलन्समध्ये परफॉर्मन्स ऑफ स्टेटसची तुलना केली जात ए. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात किती लोक बाधित झाले आहेत, त्याचा सिरो सर्व्हिलन्सचा रिपोर्ट देशस्तरावर आलेला आहे. त्यात कमी बाधित राज्य केरळ आहे. केरळ ४२ टक्के त्या खालोखाल ५५ टक्के महाराष्ट्र आहे. परंतु मध्यप्रदेश ८९ टक्के बाधित आहे, असे अहवालातून दिसते.

राज्यातील ७१ हजार आशा स्वयंसेविकांना १५०० रुपये व ३ हजार ६०० गटप्रवर्तकांना १७०० रुपये वाढ देण्यात येणार आहे. यासाठी दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्याला आज मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.

लहान मुलांची पहिल्या व दुसऱ्या लाटेतील बाधित टक्केवारी ८ ते १० टक्के :

लसीकरणाच्या मुद्यावर मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा झाली, आमचा पाठपुरावा लक्षात घेता केंद्राने सप्टेंबर महिन्यात १ कोटी ७० लाख डोसेस देण्याचं मान्य केलं आहे. ५० लाख डोसेस जास्तीचे मिळतील त्याचा उपयोग लसीकरणासाठी होईल. तिसऱ्या लाटेसाठी लसीकरण हा रामबाण उपाय आहे. लसीकरणाला गती दिली तर तितकी गंभीरता राहणार नाही. तिसरी लाट अमेरिका, युके, रशिया इथे सुरु आहे, त्यात मृत्यूदर कमी आहे. त्यामुळे लसीकरणाचा हा परिणाम असून महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात जवळपास ५२ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला असून उरलेले ४८ टक्के नागरिकांना देखील लवकरच लस मिळणार असल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : तुला घरी नेण्यासाठी कुणी आलं नाही का? पाचवीतल्या चिमुकलीसोबत शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, रत्नागिरीत खळबळ

Raj Thackeray : माझ्या परवानगीशिवाय कोणाशी बोलू नका, राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune News : चिमुरडीचा जीव वाचवणारा, फायर ब्रिगेडचा हिरो

Morning Weight loss Drink: रिकाम्या पोटी प्या 'हे' मॉर्निंग सुपरड्रिंक, वजन होईल कमी

मीरारोडला गर्जला मराठी; दिवसभरात नेमकं काय घडलं? मराठीचा एल्गार, मोर्चापूर्वी काय घडलं?

SCROLL FOR NEXT